पितृपक्ष: घरोघरच्या रीतीभाती काय सांगतात, कोणते पदार्थ खावे-कोणते टाळावे? By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 5:10 PM 1 / 8पितृपक्षाला सुरूवात झाली आहे. घरोघर आपल्या पुर्वजांचे स्मरण केले जाते. याकाळात सात्विक आहार अनेकजण करतात. त्यासाठी काही धार्मिक बंधनही असतात. मात्र शक्यतो बाहेरचे अन्न खाऊ नये असा नियम अनेकजण मानतात. 2 / 8पावसाळ्याच्या काळात बाहेरचे अन्न टाळणे, त्यामागे आजार टाळणे आणि शक्यतो आपल्या कुटुंबासह ताजे अन्नच आहारात घेणे अशी भावना असू शकते.3 / 8 मुळा आणि गाजर अनेकजण याकाळात खात नाहीत. पितृ पक्षात मसूर डाळीचे सेवन करू नये असेही काहीजण मानतात. 4 / 8पितृ पक्षात अरबीचे सेवन निषिद्ध मानले आहे, काहीजण कारली खात नाहीत. तर त्याउलट काहीजण कारल्याचे पंचामृत प्रसाद म्हणून खातात.5 / 8काहीजण याकाळात दूध पीत नाहीत. केवळ नैवेद्याला खीर करतात.6 / 8कुठल्याही प्रकारचे मांसाहार किंवा अपेयपान याकाळात अनेकजण टाळतात.7 / 8कुठलेही पदार्थ कच्चे खाणे काही भागात योग्य मानले जात नाही. विशेषत: धान्य कच्ची खाणे टाळतात.8 / 8जीरं, काळे मीठ, काळी मोहरी, काकडी आणि वांगी हे पदार्थही खाऊ नये असं काही आख्यायिका सांगतात. आणखी वाचा Subscribe to Notifications