Join us   

लठ्ठपणा ते ब्लड प्रेशर; पोहे खाण्याचे हे ७ आरोग्यदायी फायदे आपल्याला ठाऊक आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2024 3:03 PM

1 / 10
नाश्त्याला अनेक जण पोहे आवडीने खातात. पोहे खाण्याचे अनेक फायदे आहेत. काही लोकांना नियमित पोहे खायला दिले तरी ते नाक न मुरडत खाऊ शकतात. तर काही जण पोहे खाताना खूप नखरे करतात. पोहे हा एक महाराष्ट्रीयन हेल्दी नाश्ता आहे. पोह्यामध्ये देखील अनेक प्रकार आहेत(Poha Calories, Nutritional Value & Its Health Benefits).
2 / 10
लोक आपआपल्या पद्धतीने पोहे तयार करतात. पण आपल्याला पोहे खाण्याचे फायदे ठाऊक आहेत का? पोह्यात जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर आणि लोह मुबलक प्रमाणात असतात. जर आपण फिटनेस फ्रिक असाल तर, वेट लॉससाठी पोहे मदत करू शकतात.
3 / 10
पोहे खाण्याचे फायदे किती? नियमित पोहे खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात? पाहुयात.
4 / 10
नियमितपणे एक प्लेट पोहे खाणाऱ्या व्यक्तीला लोहाची कमतरता भासत नाही. ॲनिमियाचा त्रास होत नाही. पोहे खाल्ल्याने हिमोग्लोबिन आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लोह शरीराच्या पेशींना ऑक्सिजन पुरवतो.
5 / 10
मधुमेहाच्या रुग्णांसाठी पोहे अत्यंत फायदेशीर ठरते. पोहे खाल्ल्याने भूक कमी लागते. ब्लड प्रेशरची पातळी नियंत्रित राहते.
6 / 10
पोहे वेट लॉससाठीही मदत करते. एक प्लेट पोह्यात २४४ कॅलरी असतात. ज्यामुळे पोट भरलेले राहते आणि वेट लॉससाठीही मदत होते.
7 / 10
काही लोक पोह्यामध्ये भाज्या मिसळून खातात. पोह्यासोबत भाज्या खाल्ल्याने शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर पुरेशा प्रमाणात मिळतात.
8 / 10
पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेटही चांगल्या प्रमाणात आढळते. कर्बोदके शरीराला ऊर्जा देतात. शरीरातील रोगप्रतिकारशक्ति वाढते. ज्यामुळे ऋतू बदलानुसार होणारे आजार आपल्या छळत नाहीत.
9 / 10
जर आपल्याला पचनाची समस्या असेल तर, आपण पोहे खाऊ शकता. पोहे पचायला हलके असते. शिवाय यात फायबरचेही प्रमाण जास्त असते. पोटाचे विकार याने दूर होतात.
10 / 10
रोज मर्यादित प्रमाणात पोहे खाल्ले तर वजन वाढणार नाही. पण पोहे जास्त प्रमाणात खाल्ले तर वजन वाढू शकते.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.