१० मिनिटांत करा कुरकुरीत बटाटा-पोहा कटलेट; झटपट सोपा नाश्ता-चवीला अप्रतिम, पाहा रेसिपी

Published:August 9, 2023 09:06 AM2023-08-09T09:06:00+5:302023-08-09T09:10:01+5:30

Poha Potato cutlet : पोह्यांचे पाणी पूर्ण निघाल्यानंतर ते एका ताटात काढून घ्या. भिजवलेले पोहे हातानं मॅश करून घ्या. तांदळाच्या पीठाप्रमाणे पोह्यांचा गोळा मळून घ्या.

१० मिनिटांत करा कुरकुरीत बटाटा-पोहा कटलेट; झटपट सोपा नाश्ता-चवीला अप्रतिम, पाहा रेसिपी

नाश्त्याला काही वेगळं खावंसं वाटलं तर तुम्ही आहारात पोह्यांपासून बनवलेल्या पदार्थाचा आहारात समावेश करू शकता. नेहमी उपमा, पोहे हे पदार्थ खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा असते. बाहेरचे तेलकट पदार्थ खाण्याऐवजी तुम्ही पोहे आणि बटाट्यापासून बनवलेला हा पदार्थ खाऊ शकता. ( poha potato cutlet recipe how to make poha potato cutlet)

१० मिनिटांत करा कुरकुरीत बटाटा-पोहा कटलेट; झटपट सोपा नाश्ता-चवीला अप्रतिम, पाहा रेसिपी

१) सगळ्यात आधी एक वाटी पातळ पोहे घ्या आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. एका चाळणीत पोहे काढून त्यातील पाणी सर्व काढून घ्या.

१० मिनिटांत करा कुरकुरीत बटाटा-पोहा कटलेट; झटपट सोपा नाश्ता-चवीला अप्रतिम, पाहा रेसिपी

२) पोह्यांचे पाणी पूर्ण निघाल्यानंतर ते एका ताटात काढून घ्या. भिजवलेले पोहे हातानं मॅश करून घ्या. तांदळाच्या पीठाप्रमाणे पोह्यांचा गोळा मळून घ्या.

१० मिनिटांत करा कुरकुरीत बटाटा-पोहा कटलेट; झटपट सोपा नाश्ता-चवीला अप्रतिम, पाहा रेसिपी

३) त्यात उकडलेल्या बटाट्यांचा किस, बारीक चिरलेला कांदा, बारीक कापलेली शिमला मिरची, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, जीरं पावडर, धणे पावडर, गरम मसाला, चाट मसाला, चवीनुसार मीठ घाला.

१० मिनिटांत करा कुरकुरीत बटाटा-पोहा कटलेट; झटपट सोपा नाश्ता-चवीला अप्रतिम, पाहा रेसिपी

४) यात तांदळाचं पीठ आणि दाण्याचे कूट आणि कोथिंबीर घाला आणि हाताला तेल लावून पीठ व्यवस्थित मळून घ्या.

१० मिनिटांत करा कुरकुरीत बटाटा-पोहा कटलेट; झटपट सोपा नाश्ता-चवीला अप्रतिम, पाहा रेसिपी

५) या मिश्रणाचे लहान लहान गोळे बनवून घ्या आणि कडा व्यवस्थित बंद करा. तयार गोळ्यांवर तीळ घालून वाटीने हलकं दाबा. एक फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करून त्यात एक एक करून हे गोळे घाला आणि लालसर होईपर्यंत तळून घ्या.

१० मिनिटांत करा कुरकुरीत बटाटा-पोहा कटलेट; झटपट सोपा नाश्ता-चवीला अप्रतिम, पाहा रेसिपी

६) एका बाजून ५ मिनिटं शिजल्यानंतर दुसऱ्या बाजूला फिरवा नंतर दुसरी बाजूसुद्धा खरपूस तळून घ्या. तयार आहेत गरमागरम पोह्याचे कटलेट