५ पदार्थ दररोज खा- बघा भरपूर प्रोटीन देणारे सुपरफूड! रोजच्या आहारातले स्वस्त पदार्थ

Published:August 21, 2024 01:49 PM2024-08-21T13:49:16+5:302024-08-21T14:07:50+5:30

५ पदार्थ दररोज खा- बघा भरपूर प्रोटीन देणारे सुपरफूड! रोजच्या आहारातले स्वस्त पदार्थ

प्रोटीन्स हा अन्नपदार्थांमधील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पण बऱ्याच लोकांचा आहार व्यवस्थित नसल्याने शरीरात प्रोटीन्सची कमतरता निर्माण होते. (protein rich food for vegetarian people)

५ पदार्थ दररोज खा- बघा भरपूर प्रोटीन देणारे सुपरफूड! रोजच्या आहारातले स्वस्त पदार्थ

अशावेळी मग लोक दुकानात विकत मिळणारे प्रोटीन शेक घेतात. पण ते घेण्यापेक्षा तुमच्या घरातच असे काही पदार्थ आहेत, जे तुम्हाला भरपूर प्रोटीन्स देऊ शकतात. ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. (5 superfood for protein)

५ पदार्थ दररोज खा- बघा भरपूर प्रोटीन देणारे सुपरफूड! रोजच्या आहारातले स्वस्त पदार्थ

भरपूर प्रोटीन्स देणारे जे ५ प्रकारचे पदार्थ त्यांनी सांगितले आहेत, त्यापैकी पहिला पदार्थ आहे कडधान्यं. मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी नियमितपणे खा. उसळ नेहमी भात, पोळी, भाकरीसोबत खा. जेणेकरून त्यातील प्रोटीन्स शरीरात व्यवस्थित शोषून घेतले जातील. (what to eat for getting rid of protein deficiency)

५ पदार्थ दररोज खा- बघा भरपूर प्रोटीन देणारे सुपरफूड! रोजच्या आहारातले स्वस्त पदार्थ

दुसरा प्रकार म्हणजे डाळी. इडली- डोसा असे दाक्षिणात्य पदार्थ, रोजचं वरण, पिठलं, धीरडं, पराठा अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या आहारात दररोज डाळी असायला पाहिजेत. त्यातूनही भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतं.

५ पदार्थ दररोज खा- बघा भरपूर प्रोटीन देणारे सुपरफूड! रोजच्या आहारातले स्वस्त पदार्थ

दररोज मुठभर वेगवेगळ्या प्रकारचा सुकामेवा खा. त्यातून खूप चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स मिळतात.

५ पदार्थ दररोज खा- बघा भरपूर प्रोटीन देणारे सुपरफूड! रोजच्या आहारातले स्वस्त पदार्थ

भरपूर प्रोटीन्स देणारा चौथा पदार्थ म्हणजे गरीबांचा सुकामेवा म्हणून ओळखले जाणारे शेंगदाणे आणि फुटाणे. दुपारी किंवा संध्याकाळी चहासोबत बिस्कीटे खाण्याऐवजी मुठभर शेंगदाणे किंवा फुटाणे खा. प्रोटीन्सची कमतरता दूर होईल.

५ पदार्थ दररोज खा- बघा भरपूर प्रोटीन देणारे सुपरफूड! रोजच्या आहारातले स्वस्त पदार्थ

प्राेटीन्ससाठी सुपरफूड असणारा पाचवा पदार्थ आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. यासाठी दररोज एखादा ग्लास किंवा कपभर दूध, तूप, पनीरची भाजी, पनीर पराठा, दही भात, कढी भात, ताक, दही पराठा अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही दुधाचे पदार्थ खाऊ शकता.