रोजचं काम सोपं करतील ८ सिक्रेट ट्रिक्स; स्मार्ट ट्रिक्स वाचवतील वेळ, स्वयंपाक बनेल चवदार
Updated:January 6, 2023 18:09 IST2023-01-06T17:28:23+5:302023-01-06T18:09:45+5:30
Quick Kitchen Tricks : कोमट मिठाचे पाणी पनीर मऊ करते आणि ग्रेव्ही सहज शोषून घेते.

ऑफिसचं काम सांभाळून स्वयंपाक करणं म्हणजे खूपच अवघड काम. (Cooking Tips & Tricks) काही कुकींग टिप्स तुमच्या कामाचा वेळ वाचवू शकतात. इतकंच नाही तर जेवण झटपट स्वादीष्ट बनवण्यातही याचा उपयोग होऊ शकतो. (Kitchen Hacks)
१) बटाटे उकळताना त्यात चिमूटभर मीठ टाका, त्यामुळे सहज सोलण्यास मदत होते.
२) कोमट मिठाचे पाणी पनीर मऊ करते आणि ग्रेव्ही सहज शोषून घेते. पनीर शिजवण्यासाठी या पाण्याचा वापर करा.
३) पदार्थ रुचकर आणि चवदार बनवण्यासाठी घटक एका विशिष्ट क्रमाने शिजवा. उदाहरणार्थ कांदे आधी, नंतर लसूण नंतर आले आणि टोमॅटो घालावे.
४) चमकदार हिरवा रंग टिकवून ठेवण्यासाठी मटार उकळण्यापूर्वी त्यात साखर घाला.
५) डाळ शिजवताना थोडं तेल घाला. जेणेकरून डाळ मऊ शिजेल आणि चिकट होणार नाही
६) तळाशी जड असलेला पॅन निवडा. जड तळाशी पॅन अन्न जळण्यापासून रोखण्यास मदत करते.
७) पुरी कुरकुरीत बनवण्यासाठी पीठ मळताना त्यात २ ते ३ चमचे रवा घाला.
८) पास्ता किंवा नुडल्स मोकळे करण्यासाठी गरम पाण्यातून काढल्यानंतर थंड पाण्यात घाला.