रोजचं काम सोपं करतील ८ सिक्रेट ट्रिक्स; स्मार्ट ट्रिक्स वाचवतील वेळ, स्वयंपाक बनेल चवदार By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 5:28 PM 1 / 9ऑफिसचं काम सांभाळून स्वयंपाक करणं म्हणजे खूपच अवघड काम. (Cooking Tips & Tricks) काही कुकींग टिप्स तुमच्या कामाचा वेळ वाचवू शकतात. इतकंच नाही तर जेवण झटपट स्वादीष्ट बनवण्यातही याचा उपयोग होऊ शकतो. (Kitchen Hacks)2 / 9१) बटाटे उकळताना त्यात चिमूटभर मीठ टाका, त्यामुळे सहज सोलण्यास मदत होते.3 / 9२) कोमट मिठाचे पाणी पनीर मऊ करते आणि ग्रेव्ही सहज शोषून घेते. पनीर शिजवण्यासाठी या पाण्याचा वापर करा.4 / 9३) पदार्थ रुचकर आणि चवदार बनवण्यासाठी घटक एका विशिष्ट क्रमाने शिजवा. उदाहरणार्थ कांदे आधी, नंतर लसूण नंतर आले आणि टोमॅटो घालावे.5 / 9४) चमकदार हिरवा रंग टिकवून ठेवण्यासाठी मटार उकळण्यापूर्वी त्यात साखर घाला.6 / 9५) डाळ शिजवताना थोडं तेल घाला. जेणेकरून डाळ मऊ शिजेल आणि चिकट होणार नाही7 / 9६) तळाशी जड असलेला पॅन निवडा. जड तळाशी पॅन अन्न जळण्यापासून रोखण्यास मदत करते.8 / 9७) पुरी कुरकुरीत बनवण्यासाठी पीठ मळताना त्यात २ ते ३ चमचे रवा घाला.9 / 9८) पास्ता किंवा नुडल्स मोकळे करण्यासाठी गरम पाण्यातून काढल्यानंतर थंड पाण्यात घाला. आणखी वाचा Subscribe to Notifications