रामनवमी विशेष नैवेद्याचे ५ गोड पदार्थ- करायला सोपे, अतिशय चवदार आणि झटपट होणारे By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2024 11:24 AM 1 / 6अयोध्येसकट सगळ्या भारतातच रामनवमी मोठ्या उत्साहात, आनंदात साजरी होत आहे. दुपारी १२ वाजता घरोघरी राम जन्मोत्सव साजरा केला जातो आणि रामाला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. रामाला नैवेद्य दाखविण्यासाठी कोणते गोड पदार्थ कमी वेळेत करता येऊ शकतात ते पाहा..2 / 6सगळ्यात सोपा आणि बहुतांश लोकांच्या आवडीचा गोड पदार्थ म्हणजे आंबा. सध्या आंब्याचा सिझन आहे. रामरायाच्या नैवेद्यासाठी तुम्ही झटपट आमरस करू शकता3 / 6दुसरा एक सोपा पदार्थ तुम्ही करू शकता तो म्हणजे बासुंदी. गॅसवर एकीकडे दूध गरम करायला ठेवून दिलं की झालं. ते छान आळून येतं. गरजेनुसार साखर, सुकामेवा घातला की झाली बासुंदी तयार.4 / 6शिरा हा देखील एक सोपा पदार्थ आहे. या शिऱ्यामध्ये तुम्ही आमरस, केळी, अननस टाकून त्याला वेगळा फ्लेवर देऊ शकता.5 / 6खीर प्रकारातले नैवेद्य रामरायाच्या आवडीचे असतात असं म्हणतात. शेवयाची खीर, तांदळाची खीर तुम्ही झटपट करू शकता.6 / 6श्रीखंड किंवा आम्रखंड हा पदार्थही अगदी कमी वेळेत होऊ शकतो. ते इंस्टंट पद्धतीने करायचं असेल तर त्यासाठी दही मात्र घट्ट हवं. आणखी वाचा Subscribe to Notifications