refined oil or cold pressed oil? which oil is more healthy? which is the best oil for cooking
रिफाईंड ऑईल चांगलं की घाण्याचं तेल? तज्ज्ञ सांगतात, कोणतं तेल कशासाठी वापरावं-कशाचा होतो त्रास By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2024 9:13 AM 1 / 6स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरावं, ते किती प्रमाणात असावं, मुळात तेल खावे की नाही... असे तेलाविषयीचे वेगवेगळे प्रश्न नेहमीच अनेक जणांना पडतात. व्हेजिटेबल ऑईल, रिफाईंड ऑइल, कोल्ड प्रेस ऑईल किंवा घाण्याचे तेल असे अनेक वेगवेगळे प्रकारचे तेल बाजारात मिळतात.(refined oil or cold pressed oil? which oil is more healthy?)2 / 6त्यापैकी कोणते खावे आणि कोणते टाळावे हा प्रश्नही असतोच. आहारतज्ज्ञ शालिनी सुधाकर यांनी सांगितलेली माहिती एनडीटीव्हीने प्रकाशित केली आहे. त्यामध्ये बघा त्या नेमकं काय सांगत आहेत.... (which is the best oil for cooking?)3 / 6रिफाईंड ऑईल म्हणजे असं तेल ज्यावर खूप वेगवेगळ्या प्रक्रिया करून ते तयार केलं जातं. प्रकिया करून या तेलाचं शेल्फ लाईफ वाढवलं जातं. अशा तेलाला रिफाईंड ऑइल म्हणतात. या प्रक्रियेमध्ये बऱ्याचदा त्याच्यातले नैसर्गिक पौष्टिक घटक कमी होतात. 4 / 6रिफाईंड तेलाचा स्मोकिंग पॉईंट खूप जास्त असतो. त्यामुळे तळण्यासाठी हे तेल तुम्ही वापरू शकता. 5 / 6घाण्याच्या तेलालाच कोल्ड प्रेस ऑईल म्हणतात. ते पारंपरिक घर्षण क्रियेतून तयार होतं. रिफाईंड तेलावर जेवढ्या प्रक्रिया केल्या जातात तेवढ्या घाण्याच्या तेलावर केल्या जात नाहीत. त्यामुळे त्या तेलातले पौष्टिक घटक आणि अँटिऑक्सिडंट्स तसेच राहतात. या तेलाचा स्मोकिंग पॉईंट खूप कमी असतो. त्यामुळे शक्यतो तळण्यासाठी हे तेल वापरू नये.. इतर स्वयंपाकासाठी ते वापरावे.6 / 6त्यामुळे रिफाईंड ऑइल हे तळण्यासाठी तर कोल्ड प्रेस ओईल इतर स्वयंपाकासाठी वापरणे कधीही चांगले, असं शालिनी सुधाकर सांगतात. आणखी वाचा Subscribe to Notifications