प्रजासत्ताक दिन: ३ रंग वापरून केलेल्या ९ 'तिरंगा रेसिपी', बघा तुम्हाला कोणता पदार्थ आवडला By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2024 4:30 PM 1 / 9प्रजासत्ताक दिनाचा उत्साह जसा सगळीकडे दिसतो आहे, तसाच तो तुमच्या स्वयंपाक घरातही दिसून येऊ द्या... आपल्या तिरंग्याचे ३ रंग वापरून खूप छान रेसिपी करता येतात. बघा या रेसिपी कोणत्या आहेत आणि ठरवून टाका तुम्ही यातली नेमकी कोणती रेसिपी ट्राय करणार आहात.... 2 / 9सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी ही तिरंगा खीर रेसिपी त्यांच्या सोशल मिडियावर शेअर केली आहे. त्यांच्या यु ट्यूब किंवा इन्स्टाग्राम चॅनलवर ही रेसिपी नक्की पाहता येईल.3 / 9इडलीच्या पिठाचे ३ हिस्से करून त्यात वेगवेगळे फूड कलर टाकून अशी तिरंगा इडली करणंही सोपं आहे.4 / 9इडली प्रमाणेच असे तिरंगा डोसेही करता येतील. फक्त ते खूप काळजीपुर्वक करावे लागतील.(image credit- google))5 / 9प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही असे तिरंगा ढोकळेही करू शकता.6 / 9असा केकही तुम्हाला करता येईल. किंवा असं तिरंगा आयसिंग न करता केकच्या बॅटरचे ३ हिस्से करा. त्यात तिरंग्याचे ३ रंग टाका आणि एकानंतर एक ते बॅटर सेट करा. अशा पद्धतीनेही तिरंगा केक करता येईल.7 / 9नारळाच्या बर्फीलाही असं तिरंग्याच्या रंगात रंगवता येईल.8 / 9तिरंगा सॅण्डविच हा तर अनेक जणांचा ऑल टाईम फेव्हरेट पदार्थ आहे. 9 / 9अशा पद्धतीचं तिरंगा स्टाईल सलाड डेकोरेशनही करता येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications