1 / 8साबुदाण्याची खिचडी आपल्या घरात उपवास किंवा सकाळच्या नाश्त्यात बनवली जाते. अनेकदा ती बनवताना साबुदाणा व्यवस्थित भिजला जरी असेल तरी खूपच कोरडी किंवा गचकी होते. (How to soak sabudan)2 / 8साबुदाण्याची खिचडी बनवताना नेमकं काय चुकत आपल्याला कळत नाही. या सोप्या टिप्स लक्षात ठेवा साबुदाणा खिचडी होईल मोकळी-मऊसुत (5common mistakes to avoid while making sabudana khichdi)3 / 8साबुदाणा स्वच्छ धुवून घ्या, ज्यामुळे त्यात असणारा पावडर निघून जाईल. त्यानंतर साबुदाणा बुडेल इतक पाणी घालून रात्रभर किंवा ६ ते ७ तास भिजत घाला. 4 / 8साबुदाणा कढईत घालण्यापूर्वी चमच्याने मोकळा करुन घ्या. ज्यामुळे त्याचा गचका होणार नाही. 5 / 8साबुदाणा बनवताना तेलाऐवजी तूप घातले तर चव चांगली येते. तसेच मिरचीला फोडणी देताना ती चांगली तळून घ्या, ज्यामुळे ती बाधत नाही. त्याचा अर्क तुपात उरतो, ज्यामुळे साबुदाणा अधिक टेस्टी होतो. 6 / 8बटाट्याचे पातळ काप किंवा उकडलेला बटाटा घाला. ज्यामुळे पदार्थाची चव चांगली लागते. बटाटा लवकर शॅलो फ्राय होतो. 7 / 8साबुदाणा कढईत घालण्यापूर्वी तो हळूहळू घाला. सगळा एकत्र घालून नका. हलक्या हाताने तुपावर परतून घ्या. 8 / 8साबुदाणा चांगला वाफवला की तो वातड किंवा कडक होत नाही. कढई किंवा खोलगट भांड्यात खिचडी बनवू नका. पॅन किंवा पसरट भांड्यात बनवा यामुळे ती लवकर शिजते.