कणीक रात्री भिजवून फ्रिजमध्ये ठेवावी का? रात्री भिजवलेल्या कणकेच्या सकाळी चपात्या केल्या तर..
Updated:July 20, 2024 15:07 IST2024-07-20T12:49:10+5:302024-07-20T15:07:42+5:30
Side Effects OF Eating Roties From Refrigerated Dough : चपात्यांमधील पोषक तत्वांचा फायदा मिळण्यासाठी तुम्ही डाएटमध्ये फ्रेश पिठाचा समावेश करा.

चपातीशिवाय भारतीय थाळी परिपूर्ण नाही. चपाती नेहमीच्या जेवणाचा एक महत्वाचा घटक आहे. अनेक लोक आळशीपणामुळे किंवा वेळेअभावी फ्रिजमध्ये चपातीचं पीठ मळून ठेवून देतात नंतर या पिठाची चपाती करून खातात. चपातीचं पीठ मळून लगेचच फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील पोषक घटक कमी होण्याची शक्यता असते. फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठाच्या चपात्या खाल्ल्याने काय परिणाम होते ते समजून घेऊ. (Side Effects OF Eating Roties From Refrigerated Dough)
जर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवल्या कणकेच्या चपात्या सकाळी बनवत असाल तर याचा पचनसंस्थेवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. वारंवार तुम्ही हेच करत असाल तर गॅस, एसिडिटी यांसारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.
याव्यतिरिक्त मळलेलं पीठ जास्तवेळ फ्रिजमध्ये ठेवल्यानं त्याला बुरशीसुद्धा येऊ शकते. ज्यामुळे तुमची तब्येत खराब होण्याचा धोका असतो.
चपातीचं पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर त्यात बॅक्टेरियाज तयार होण्याची शक्यता वाढते. याशिवाय फ्रेश पिठापासून तयार झालेल्या चपात्यांची चव आणि फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या चपात्यांची चव यात फरक असतो.
ताज्या तयार केलेले चपात्या अधिक मऊ, चवीला चांगल्या असतात. तर तुम्हाला आपली तब्येत चांगली ठेवायची असेल तर फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठाच्या चपात्या करणं बंद करा.
चपात्यांमधील पोषक तत्वांचा फायदा मिळण्यासाठी तुम्ही डाएटमध्ये फ्रेश पिठाचा समावेश करा. याव्यतिरिक्त चपातीचं पीठ मळतानना नेहमी साफ-सफाई ठेवा.
चपात्यांमधील पोषक तत्वांचा फायदा मिळण्यासाठी तुम्ही डाएटमध्ये फ्रेश पिठाचा समावेश करा. याव्यतिरिक्त चपातीचं पीठ मळताना नेहमी साफ-सफाई ठेवा.
चपातीचं पीठ फ्रिजमध्ये ठेवत असाल तर त्याला तेल लावून ठेवा. जेणेकरून पीठ काळं पडणार नाही.