1 / 7नाश्याला रोज काय करावं हा प्रश्न जवळपास प्रत्येक महिलेलाच रोज पडतो. कारण नाश्ता चवदार असावा शिवाय काहीतरी वेगळा असावा अशी घरच्यांची इच्छा असते तर घरातल्या मंंडळींना पौष्टिक खाऊ घालावं असं महिलांना वाटत असतं (simple, easy and tasty breakfast menu). आता या दोन्ही गोष्टी ज्या पदार्थात असतील शिवाय तो कमी वेळेत झटपट होईल असे हे काही पर्याय पाहा..(easy and quick breakfast recipe)2 / 7पहिला पदार्थ म्हणजे पोहे. पोहे करायला खूपच कमी वेळ लागतो. शिवाय ते करण्यासाठी खूप काही तयारी करण्याची गरज नसते. पोह्यांच्या चवीमध्ये वेगळेपण आणण्यासाठी त्यात कांद्यासोबतच टोमॅटो, गाजर, मटार, पत्ताकोबी, फ्लॉवर अशा सगळ्या भाज्या तुम्ही घालू शकता.3 / 7दुसरा पदार्थ म्हणजे ओट्स. ओट्समध्येही आलं, लसूण, मिरची, कांदा यासोबतच तुम्हाला आवडतील त्या सगळ्या भाज्या, स्वयंपाक घरातले वेगवेगळे मसाले घाला आणि चवदार ओट्स तयार करा.4 / 7तिसरा पदार्थ म्हणजे सॅण्डविच. सॅण्डविच करताना त्यात भरपूर भाज्या घाला. जेणेकरून भरपूर भाज्या पोटात जातील आणि तो एक हेल्दी ब्रेकफास्ट होईल.5 / 7चौथा पदार्थ आहे उत्तपा. उत्तपा करताना त्याच्या बेसवर तुम्ही वेगवेगळे चायनिज सॉस लावून त्याची चव नेहमीपेक्षा थोडी वेगळी करण्याचा प्रयत्न करू शकता. नंतर त्यावर सगळ्या भाज्या, पनीर, चीज घाला. अतिशय चवदार नाश्ता होईल.6 / 7पाचवा पदार्थ म्हणजे पराठे. घरात जी कोणती भाजी असेल तर जास्तीतजास्त प्रमाणात घालून चवदार पराठे करा आणि भरपूर तूप लावून ते दह्यासोबत सर्व्ह करा. हा हा म्हणता पराठे फस्त होतील. 7 / 7पनीरचे छोटे तुकडे करा आणि ते कढईमध्ये तूप किंवा बटर टाकून परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या, टोमॅटो सॉस, स्वयंपाक घरातले मसाले असं सगळं घालून फ्राय करून घ्या. हा प्रोटीनयुक्त नाश्ता सगळ्यांना खूप आवडेल.