1 / 9आपल्यापैकी बहुतेक घरांमध्ये रोजच्या जेवणांत वरण - भात केला जातो. गरमागरम वरण - भात वर तुपाची धार असे साधे पण पौष्टिक जेवण सगळ्यांनाच फार आवडते. वरण - भात या कॉम्बिनेशन फूडमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे ते शरीरासाठी पौष्टिक (7 Different Types Of Maharashtrian Varan Recipe) देखील असते. प्रत्येक घरोघरी वरण करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. 2 / 9जर आपल्याला नेहमीचे तेच ते वरण खाऊन कंटाळा (Maharashtrian Style Varan) आला असेल तर आपण या वरणाचे वेगवेगळे प्रकार नक्की घरच्याघरीच करुन पाहू शकतो. वरण करण्याची पद्धत आणि प्रकार किती आहेत, ते पाहूयात. 3 / 9साधं वरण हा वरणाचा एक कॉमन पण अतिशय साधा असला तरीही चविष्ट लागणारा असा प्रकार आहे. साध्या वरणाला साजूक तूप जिऱ्याची खमंग फोडणी दिली जाते. फक्त वरणाला साजूक तूप - जिऱ्याची फोडणी दिली की ते वरण आणखीनच चविष्ट होते. 4 / 9साध्या वरणाप्रमाणेच चवीला थोडेसे आंबट गोड असणारे वरण देखील अतिशय चांगले लागते. हे वरण तयार करण्यासाठी तुरीची डाळ शिजवून त्याला नेहमीप्रमाणे खमंग फोडणी दिली जाते. त्यानंतर त्यात चवीनुसार चिंचेचा कोळ आणि गूळ घातले जाते. यामुळे वरणाला आंबट गोड अशी चव येते. चिंच - गूळ घातल्याने वरणाला येणाऱ्या आंबट - गोड चवीमुळेच याला 'आंबट वरण' असे म्हटले जाते. 5 / 9शेवग्याच्या शेंगा घालून हे वरण केले जाते म्हणून याला शेवग्याच्या शेंगांचे आंबट वरण असे म्हटले जाते. त्याचीही एक वेगळी चव असते. फ़ोडणीत शेवग्याच्या शेंगा जरा परतून, मसाल्याबरोबर शिजवून घ्यावे बाकी नेहमीचे वरण करतो तशाच पद्धतीने वरण करून घ्यावे. 6 / 9काहीवेळा घरात जास्त कोथिंबीर असते. वड्या वगैरे करुन झाल्या, तरीही उरते. मग अशावेळी कोथिंबीरीचे वरण करायचे. यासाठी वाटीभर कोथिंबीर, देठासकट अगदी बारिक चिरुन घ्यायची. त्याबरोबर हिरव्या मिरच्या आणि लसूणही बारीक चिरायचा. नेहमीप्रमाणे, हळद हिंग घालून डाळ शिजवून घ्यायची. शक्यतॊ तूपाची फ़ोडणी करुन त्यात जिरे टाकायचे, मग हिरव्या मिरच्या, लसूण परतून घ्यायचा, चिमुटभर हळद टाकून त्यात चिरल्यापैकी अर्धी कोथिंबीर टाकायची. मग त्यावर डाळ टाकायची. जरा उकळून अगदी शेवटी, उरलेली कोथिंबीर घालायची. आणि गॅसवरुन उतरले कि आवडीप्रमाणे लिंबू पिळायचे. 7 / 9 यासाठी नेहमीप्रमाणेच डाळ शिजवून घ्यायची. अगदी थोड्या तेलावर मोहरीची फ़ोडणी करुन त्यावर ही डाळ ओतायची. ही पण जरा पातळच असते. मग यात ओले खोबरे आणि थोडे जिरे वाटून टाकायचे आणि हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन टाकायच्या, मालवणी वरण खाण्यासाठी तयार आहे. 8 / 9तेलात जिरे, मोहरी, भरपूर लसणाच्या पाकळ्या, कडीपत्ता, हिंग घालूंन खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी. अशा पद्धतीने वरण तयार करताना त्यात भरपूर लसणाच्या पाकळ्या घातल्याने त्याला लसणाचा सुंदर असा सुवास येतो. याचबरोबर लसणाची चव देखील अतिशय चांगली लागते. 9 / 9 तुरीच्या डाळीप्रमाणेच आपण पिवळ्या मुगाच्या डाळीचे देखील वरण तयार करु शकतो. मुगाच्या डाळीचे वरण करण्याची पद्धत ही आपल्या नेहमीच्या वरणाप्रमाणेच असते. आपण यात आपल्या आवडीनुसार, टोमॅटो, कांदा, खोबरं देखील घालू शकता.