1 / 7आजही बऱ्याच घरात तूप विकत न आणता घरीच तयार केले जाते. घरच्याघरी साजूक तूप (Store Malai Like This To Keep It Fresh For Long) तयार करण्यासाठी आपण रोज दुधावरची साय साठवून ठेवतो. जर ही साय व्यवस्थित स्टोअर करुन ठेवली नाही तर लगेच खराब होते किंवा त्याला बुरशी येते. यासाठी घरच्याघरीच तूप तयार करण्यासाठी दुधावरची साय साठवून ठेवताना लक्षात ठेवाव्यात अशा काही गोष्टी. या टिप्सचा वापर केला तर साय खराब न होता दीर्घकाळ चांगली टिकून राहील व त्यापासून अतिशय चविष्ट आणि रवाळ तूप तयार होईल. 2 / 7१. तूप करण्यासाठी साय साठवून ठेवताना स्टीलच्या डब्याचा किंवा भांड्याचा वापर करावा. स्टीलच्या भांड्यामध्ये साय दीर्घकाळ फ्रेश राहते. प्लास्टिकच्या डब्यात साठवून ठेवल्यास त्यातून दुर्गंधी येते किंवा ते लवकर खराब होऊ शकते. 3 / 7२. स्टीलच्या डब्यात दुधाची साय साठवण्यापूर्वी डब्याच्या आतील बाजूस तूप लावून ग्रीस करा. या ट्रिकमुळे दुधाची साय अधिक दिवस चांगली टिकून राहील. 4 / 7३. दुधाची साय डिप फ्रिजरमध्ये स्टोअर करुन ठेवणे उत्तम ठरू शकते. थंड वातावरणामुळे दुधाच्या सायीमध्ये बॅक्टेरिया वाढणार नाही. यामुळे साय लवकर खराब होणार नाही.5 / 7४. जेव्हा पण दुधाची साय साठवून ठेवत असाल तेव्हा, डब्याला किंवा भांड्याला झाकण असेल, याची खात्री करा. झाकलेल्या भांड्यात साय दीर्घकाळ टिकून राहते. साय गरम ठिकाणी साठवून ठेवल्यास त्यात फंगस तयार होते. ज्यामुळे सायीमधून दुर्गंधी तर येतेच, शिवाय साय चवीला आंबट लागते.6 / 7५. साय साठवून ठेवताना त्यात थोडे दूध घालत राहा. नंतर चमच्याने मिक्स करा. यामुळे त्यात फंगस तयार होणार नाही किंवा त्यातून दुर्गंधीही येणार नाही.7 / 7६. जर आपल्याला सायीमधून जास्त प्रमाणात तूप काढायचे असेल तर आपण साय साठवताना त्यात एक चमचा दही मिसळू शकता. त्यामुळे सायीची चवही खराब होत नाही व ती दीर्घकाळ टिकते.