आजचा रंग हिरवा :खा 6 हिरव्यागार भाज्या - फळे, आणि वजन करा झटपट कमी

Published:October 20, 2023 08:50 AM2023-10-20T08:50:10+5:302023-10-20T08:55:01+5:30

The 6 Healthiest Leafy Green Vegetables : आजच्या दिवशी हिरव्या भाज्या खाच, आरोग्याला मिळतील जबरदस्त फायदे, राहाल सुदृढ

आजचा रंग हिरवा :खा 6 हिरव्यागार भाज्या - फळे, आणि वजन करा झटपट कमी

श्रावणाला दर्शवणारा रंग म्हणजे हिरवा. हिरवा रंग डोळ्यांसाठी उत्तम मानला जातो. हा रंग आपल्या मनालाही प्रसन्न करतो. नवरात्रीत हिरव्या रंगाला खूप महत्व आहे. हिरव्या रंगाचे पोशाख इंडियन स्किन टोनवर शोभून दिसतात. यासह हिरव्या रंगाचे पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात(The 6 Healthiest Leafy Green Vegetables).

आजचा रंग हिरवा :खा 6 हिरव्यागार भाज्या - फळे, आणि वजन करा झटपट कमी

आज पाचवी माळ. आजचा रंग हिरवा. हिरवा रंग लक्षवेधी ठरतो, त्याचप्रमाणे आहारातील पदार्थही तितकेच लक्षवेधी आणि चविष्ट असतात. प्रत्येक पालेभाज्या हिरव्या रंगाचे असतात. त्यातील पौष्टीक गुणधर्म आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. आज आपण असे ६ पदार्थ पाहणार आहोत, जे दिसायला रंगाने हिरवे असतील पण, आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.

आजचा रंग हिरवा :खा 6 हिरव्यागार भाज्या - फळे, आणि वजन करा झटपट कमी

ज्यांना मेथीची भाजी नाही आवडत. त्यांनी नाश्त्यामध्ये मेथीचे पराठे खावे. मेथीच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने, व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात आढळते. मेथीच्या पानांची पालेभाजी नुसती रुचकरच नव्हे, तर अनेक विकारांचा धोका कमी करणारी ठरते.

आजचा रंग हिरवा :खा 6 हिरव्यागार भाज्या - फळे, आणि वजन करा झटपट कमी

थंडीच्या महिन्यात तज्ज्ञ पालक खाण्याचा सल्ला देतात. पालकामध्ये कॅलरीज, प्रोटीन, कार्ब आणि फायबर असते. यासह पनीरमधील व्हिटॅमिन-बी, कॅल्शियम, फॉस्फरस आणि सेलेनियम शरीरासाठी फायदेशीर ठरते. आपण लंचमध्ये पालक-पनीर तयार करून खाऊ शकता.

आजचा रंग हिरवा :खा 6 हिरव्यागार भाज्या - फळे, आणि वजन करा झटपट कमी

लंचमध्ये आपण हिरव्या मुगाची उसळ करून खाऊ शकता. मूग अनेक आवश्यक पोषक तत्वांचा उत्तम स्रोत आहे. हिरवे मूग प्रथिने, कॅल्शियम लोह, फायबर, तसेच व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडेंट्सने समृद्ध आहे. आपण हिरव्या मुगाचे अनके पदार्थ तयार करून खाऊ शकता.

आजचा रंग हिरवा :खा 6 हिरव्यागार भाज्या - फळे, आणि वजन करा झटपट कमी

डिनरमध्ये अनेकांना डाळ-भात खायला आवडते. आपण डिनरसाठी खास पालक-डाळ ही रेसिपी तयार करून शकता. पालकामध्ये कॅलरीज, प्रोटीन, कार्ब आणि फायबर असते. तर डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पालक डाळ आपल्या आहारात समावेश करा.

आजचा रंग हिरवा :खा 6 हिरव्यागार भाज्या - फळे, आणि वजन करा झटपट कमी

अनेकांना पेरू आवडते. पेरू खाण्याचेही भन्नाट फायदे आहेत. पेरूमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी यासह विविध गुणधर्म असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. जर जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी हटके खायचं असेल तर पेरूची चटणी नक्कीच करून खा.

आजचा रंग हिरवा :खा 6 हिरव्यागार भाज्या - फळे, आणि वजन करा झटपट कमी

दोडक्यामध्ये कमी कॅलरी आणि फायबर जास्त असते. त्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, आहारात दोडक्याचा समावेश कराच. आपण दोडक्याची आमटी, भाजी किंवा इतर भाज्यांमध्ये मिक्स करून खाऊ शकता.