थंडीच्या दिवसांत चहा करताना वापरा ८ सिक्रेट पदार्थ, चहाचा स्वाद वाढेल-आरोग्यासही फायदेशीर...

Updated:December 17, 2024 14:31 IST2024-12-17T14:21:24+5:302024-12-17T14:31:37+5:30

The 8 Spices You Need for Homemade Chai : Homemade Chai Spice Mix Recipe : Authentic Homemade Indian Chai Tea Recipe : चहा करताना त्यात घाला ८ मसाल्यांचे पदार्थ, चव लागेल भन्नाट - असा गरमागरम चहा पिऊन तर पाहा...

थंडीच्या दिवसांत चहा करताना वापरा ८ सिक्रेट पदार्थ, चहाचा स्वाद वाढेल-आरोग्यासही फायदेशीर...

मस्त हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत गरमागरम चहाची तलफ अनेकदा लागतेच. चहाचा स्वाद आणि चव अधिक वाढवण्यासाठी आपण त्यात वेगवेगळ्या प्रकारचे मसाले (The 8 Spices You Need for Homemade Chai) घालतो. चहात मसाले घातल्यावर ऐन थंडीत असा मसाला चहा प्यायल्याने चहाची तलफही भागवली जाते, सोबतच मसाल्यातील औषधी गुणधर्म देखील आपल्या आरोग्यास फायदेशीर ठरतात. यासाठीच थंडीत चहा पिताना त्याचा स्वाद आणि चव वाढवण्यासाठी त्यात कोणते मसाल्याचे पदार्थ घालता येतील, ते पाहूयात.

थंडीच्या दिवसांत चहा करताना वापरा ८ सिक्रेट पदार्थ, चहाचा स्वाद वाढेल-आरोग्यासही फायदेशीर...

चहात किसलेलं आलं टाकल्यामुळे चहाला चव तर येतेच शिवाय सर्दी, खोकला, ताप किंवा डोकंदुखी असल्यास आरामही मिळतो. सांधेदुखीचा त्रास असल्यास दिवसातून दोनदा आलं घातलेला चहा प्यायल्याने फायदा होतो.

थंडीच्या दिवसांत चहा करताना वापरा ८ सिक्रेट पदार्थ, चहाचा स्वाद वाढेल-आरोग्यासही फायदेशीर...

चहात वेलची टाकल्यास पचनास चांगला फायदा होतो शिवाय अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

थंडीच्या दिवसांत चहा करताना वापरा ८ सिक्रेट पदार्थ, चहाचा स्वाद वाढेल-आरोग्यासही फायदेशीर...

ऋतू कोणताही असो चहात दालचिनी अवश्य घालावी. यामुळे चहाला स्वाद आणि गंध तर येतोच शिवाय दालचिनीमुळे खोकला किंवा कफाचा त्रास होत नाही.

थंडीच्या दिवसांत चहा करताना वापरा ८ सिक्रेट पदार्थ, चहाचा स्वाद वाढेल-आरोग्यासही फायदेशीर...

जायफळ हा एक सुगंधी मसाला आहे जो पदार्थांना चव देण्यासाठी प्रामुख्याने वापरला जातो. चहासाठी पाणी उकळत असताना पाण्यामध्ये चिमूटभर जायफळ पावडर किंवा जायफळ किसून घाला. यामुळे चहाची चव दुपटीने वाढते.

थंडीच्या दिवसांत चहा करताना वापरा ८ सिक्रेट पदार्थ, चहाचा स्वाद वाढेल-आरोग्यासही फायदेशीर...

चहात तुळशीची पानं टाकल्यामुळे तुळशीची पाने आपले शरीर फक्त आतूनच स्वच्छ करत नाही तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतात.

थंडीच्या दिवसांत चहा करताना वापरा ८ सिक्रेट पदार्थ, चहाचा स्वाद वाढेल-आरोग्यासही फायदेशीर...

हवामान थंड असल्यास मसाला चहा करताना त्यात लवंग घालावी. लवंगमध्ये भरपूर प्रमाणात अँण्टिऑक्सिडण्टस असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

थंडीच्या दिवसांत चहा करताना वापरा ८ सिक्रेट पदार्थ, चहाचा स्वाद वाढेल-आरोग्यासही फायदेशीर...

गवती चहामध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल आणि फोलेट हे गुणधर्म असतात. गवती चहा घालून केलेला चहा प्यायल्याने पचनसंस्था मजबूत होते शिवाय सर्दी, खोकल्यापासून आराम मिळतो.

थंडीच्या दिवसांत चहा करताना वापरा ८ सिक्रेट पदार्थ, चहाचा स्वाद वाढेल-आरोग्यासही फायदेशीर...

बडीशेपमध्ये असणारे फायबर आणि अन्य काही महत्वाचे घटक आपल्या शरीरातील टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी उपयुक्त असतात. यामुळे तुमचे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. यासाठी चहामध्ये चमचाभर बडीशेप घालून पिणे अधिक फायदेशीर ठरते.