जगात भारी ठरलेले ५ भारतीय व्हेज पदार्थ, हे बेस्ट पदार्थ-सांगा तुम्हाला आवडतात का?
Updated:January 15, 2024 16:38 IST2024-01-15T15:52:25+5:302024-01-15T16:38:35+5:30

पावभाजी, सामोसा, इडली- डोसा अशा भारतीय पदार्थांची जादू तर सगळ्या जगावरच आहे. आपली जिलेबी आणि रसगुल्लाही परदेशी लोक मोठ्या उत्साहात खातात. आता Taste Atlas यांनी २०२३ या वर्षातली जगभरातील बेस्ट पदार्थांची यादी नुकतीच जाहीर केली असून त्यात ५ भारतीय शाकाहारी पदार्थांना स्थान मिळालं आहे.
त्या ५ पदार्थांपैकी सगळ्यात अग्रेसर आहे बासमती तांदूळ. 'Best rice across the globe' असं त्याचं वर्णन केलेलं आहे
या यादीमध्ये ४ प्रकारच्या लस्सीचा समावेश असून त्यापैकी सगळ्यात जास्त रेटिंग मँगो लस्सीला मिळाले आहेत.
ज्या मसाल्याशिवाय आपल्याकडच्या भाज्यांना स्वाद येऊच शकत नाही, असा गरम मसाला देखील या यादीमध्ये आहे.
वेगवेगळ्या पंजाबी भाज्यांचा स्वाद खुलविणारी बटर गार्लिक नान देखील या यादीमध्ये आहे.
गरम मसाल्याशिवाय चहा मसाला हा पदार्थही या यादीमध्ये मानाचे स्थान पटकावून आहे.