1 / 9उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर फळे खायला हवी. विविध प्रकारची फळे नियमित खाणे शरीरासाठी फायद्याचे ठरते. फळे चवीलाही छान असतात आणि पौष्टिकही असतात. 2 / 9डाळिंब्याचे दाणे चवीला फार मस्त लागतात. त्यामुळे लहान मुलेही अगदी आवडीने खातात. डाळिंब खाणे फार फायद्याचे ठरते. रोजच्या आहारामध्ये डाळिंब्याचा समावेश करुन घेणे फार फायद्याचे ठरते. 3 / 9डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात अँण्टी ऑक्सिडंट्स असतात. तसेच विविध जीवनसत्वेही असतात. डाळिंब फायबर मिळवण्यासाठी फार चांगला स्त्रोत आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 4 / 9हृदयासाठी डाळिंब चांगले असते. हृदयाचे काही त्रास असतील तर रोज एक डाळिंब खाणे फायद्याचे ठरते. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी डाळिंब उपयोगी ठरते. 5 / 9पचनासाठी डाळिंबाचा रस औषधी आहे. पोटाचे त्रास कमी होतात. तसेच डाळिंब पोटाला थंडावा देते. 6 / 9स्मरणशक्तीसाठी डाळिंबे चांगले असते. मेंदू तल्लख करण्यासाठी त्याची मदत होते. स्मरणाचे आजार उद्भवण्याचा धोका कमी होतो.7 / 9वजन कमी करण्यासाठी रोज एक ग्लास डाळिंब ज्यूस पिणे अत्यंत फायदेशीर ठरते. त्यामध्ये भरपूर प्रथिने असतात. ज्याची वजन व्यवस्थापनासाठी मदत होते. 8 / 9त्वचेसाठी डाळिंब्याची अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्स बाजारात मिळतात. त्वचेसाठी हे फळ फार उपयुक्त असते. त्वचा छान उजळते. तसेच डाग कमी होतात. पिंपल्सचे प्रमाणही कमी होते.9 / 9डाळिंब ज्यूस प्यायल्याने अशक्तपणा दूर होतो. त्यामुळे दवाखान्यामध्ये भरती असलेल्या रुग्णांना हा ज्यूस दिला जातो. शरीराला ऊर्जा देण्याचे काम डाळिंब करते.