आजचा रंग पिवळा : पाहा पिवळ्या रंगाचे ६ पौष्टीक-चविष्ट पदार्थ, आहारात यांचा समावेश कराच, कारण.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2023 8:40 AM 1 / 8नऊ दिवस भक्तीभाव व उत्साहाने साजरा करण्यात येणारा सण म्हणजे नवरात्र (Navratri). या नऊ दिवसात अनेक जण उपवास धरतात. रात्री रास-गरबा खेळतात. तर काही जण नऊ दिवसांचे कलर्स फॉलो करून मिरवतात. या रंगांना खूप महत्त्व आहे. ज्याप्रमाणे आपण कलर्सचा ट्रेण्ड फॉलो करतो, त्याप्रमाणे आहारातही त्या विशिष्ट रंगाच्या पदार्थांचा समावेश करा(Today's Color Yellow : Check out 6 Nutritious Yellow Foods, Include In Your Diet).2 / 8आज नवरात्रीची पाचवी माळ. सर्वत्र आपल्याला पिवळमय वातावरण झालेलं पाहायला मिळेल. जर आपण पोशाखात देखील रंगांना फॉलो करत असाल तर, आहारात देखील फॉलो करायला काही हरकत नाही. पाचव्या दिवशी आपण आपल्या आहारात पिवळ्या रंगाच्या ६ पदार्थांना अॅड करू शकता.3 / 8नाश्त्यामध्ये बरेच जण पोहे खातात. नाश्त्यामधील हा एक हेल्दी पदार्थ आहे. आपण आजच्या दिवसाची सुरुवात बटाटा पोहे खाऊन करू शकता. बटाटे पोहे करायला खूप सोपे आहे. झटपट होणारा हा पदार्थ हेल्दी असून, याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते.4 / 8पिवळी ढोबळी मिरची दिसायला फार आकर्षक दिसते. पिवळ्या सिमला मिरचीमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. आपण याची भाजी किंवा सॅलॅडमध्येही मिक्स करून खाऊ शकता.5 / 8असं कोणीच नसेल ज्याला पिवळ्या बटाट्याची भाजी आवडत नसेल. पिवळ्या बटाट्याची भाजी झटपट व कमी साहित्यात तयार होते. मुख्य म्हणजे ही भाजी पुरी किंवा चपातीसह चविष्ट लागते. आपण ही भाजी लंचमध्ये तयार करून खाऊ शकता.6 / 8जर आपल्याला रोजची तिच तिच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर, मूग डाळीची सुकी उसळ करून खा. ही उसळ आरोग्यासाठी पौष्टीक ठरते, कारण यात प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. आपण नियमित मूग डाळीची सुकी उसळ खाऊ शकता.7 / 8आपण दुपारच्या वेळेस ताकाची कढी करून भातासह खाऊ शकता. ताकाच्या कढीमध्ये हळद, कडीपत्ता आणि मिरचीची फोडणी दिल्याने कढीची चव आणखी वाढते. आपण त्यात कांदा भजी घालून कढी पकोडा तयार करू शकता. कढी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यात कॅलरीजचे प्रमाण कमी असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.8 / 8जर आपल्याला चटपटीत खायला आवडत असेल तर, तोंडी लावण्यासाठी आपण लिंबाचं लोणचं खाऊ शकता. लिंबू खाण्याचे अनेक फायदे आहेत. अन्य आंबट फळांच्या तुलनेत लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असते. यासह त्यात पेक्टिन फायबर आढळते. ज्यामुळे पचन सुधारते. आणखी वाचा Subscribe to Notifications