Join us   

मिळमिळीत जेवणाला एकदम झणझणीत चव आणणारा वऱ्हाडी ठेचा! बघा फक्त ५ मिनिटांची सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2024 4:51 PM

1 / 6
ठेचा हा एक अतिशय लोकप्रिय महाराष्ट्रीयन पदार्थ. हिरव्या मिरच्यांचा झणझणीत ठेचा तर सगळ्याच महाराष्ट्रात होताे.
2 / 6
पण खास लाल मिरच्यांपासून तयार होणाऱ्या वऱ्हाडी ठेच्याची तर बातच न्यारी. हा ठेचा करण्याची रेसिपी अतिशय सोपी आहे. लाल मिरच्यांचा झणझणीत वऱ्हाडी ठेचा जेवणात तोंडी लावायला असेल तर साध्याच, अगदी मिळमिळीत जेवणाची चवही कित्येक पटीने वाढते. बघा कसा करायचा हा ठेचा..
3 / 6
वऱ्हाडी ठेचा करण्यासाठी आपल्याला लाल मिरच्या लागणार आहेत. त्या वाळलेल्या नसाव्या. छान रसरशीत, चमकदार असाव्या.
4 / 6
साधारण आतपाव लाल मिरच्या असतील तर त्याला अर्धी वाटी लसूण घ्या.
5 / 6
लाल मिरच्या, जिरे, लसूण, दिड ते दोन लिंबांचा रस आणि चवीनुसार मीठ हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घाला आणि छान बारीक वाटून घ्या. तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्यात हा ठेचा करून पाहा.
6 / 6
आता मिक्सरमधलं वाटण एका वाटीमध्ये काढून घ्या. कोणी काेणी हा ठेचा असाच खातात. तर कोणी त्याला तेल, मोहरीची फोडणी देऊन खातात किंवा ठेचा कढईत टाकून थोडासा परतून घेतात. यामुळे ठेच्याचा तिखटपणा थोडा कमी होतो तसेच तो अधिककाळ टिकतो.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती