Vasant panachami special: वसंत पंचमी नैवेद्य स्पेशल ५ पिवळे पदार्थ; सरस्वती पूजेसाठी करा खास प्रसाद By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2022 3:56 PM 1 / 8१. वसंत पंचमी म्हणजे देवी सरस्वतीचा जन्मोत्सव. भारतात विविध राज्यांमध्ये हा सण मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा केला जातो. पंजाब- हरियाणामध्ये पतंग उडवून तर बंगालमध्ये सरस्वती देवीचे पुजन करून वसंत पंचमी साजरी करतात. काही ठिकाणी या दिवशी गुरूपुजनही करण्यात येते. 2 / 8२. दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये वसंत पंचमीला श्री पंचमी असे म्हटले जाते. गुजरातमध्ये यादिवशी एकमेकांना फुलं आणि आंब्याची पाने देऊन शुभेच्छा दिल्या जातात. बंगाली लोकं यादिवशी सरस्वतीला बोरांचा नैवेद्य दाखवतात आणि त्यानंतर ती बोरं प्रसाद म्हणून खातात. 3 / 8३. वसंत पंचमीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे विशेष महत्त्व आहे. यादिवशी अनेक प्रांतांमध्ये घराची सजावट पिवळी फुले वापरून करण्यात येते. घरातील सगळे सदस्य पिवळ्या रंगाचे कपडे घालतात आणि सरस्वतीला नैवेद्य दाखविण्यासाठीही पिवळ्या रंगाचे पदार्थ केले जातात. 4 / 8४. असं म्हणतात की बुंदी हे सरस्वतीचं आवडतं पक्वान्न आहे. त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी अनेक घरांमध्ये साजूक तुपात बुंदीचे लाडू केले जातात आणि सरस्वतीला त्याचाच नैवेद्य दाखविला जातो. 5 / 8५. वसंत पंचमीच्या दिवशी केशर भाताचेही विशेष महत्त्व असते. गूळ आणि केशर यांचे पाणी एकत्र करून त्यात हा भात शिजवला जातो. त्यानंतर सुकामेवा टाकून या भाताची सजावट करण्यात येते. 6 / 8६. श्रीखंड हे महाराष्ट्राचं पारंपरिक पक्वान्न. पण वसंत पंचमीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे महत्त्व असल्याने यादिवशी खास केशर टाकून श्रीखंड करण्यात येते. झटपट होणारा आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणून बहुसंख्य घरात श्रीखंडाचा नैवेद्य करण्यात येतो. 7 / 8७. केशरी हलवादेखील वसंत पंचमीच्या दिवशी केला जातो. आपण जसा रव्याचा शिरा करतो, त्याप्रमाणे रवा भाजून घ्यायचा. त्यात साखरेऐवजी गुळाचं पाणी टाकायचं. केशर आणि सुकामेवा टाकून या हलव्याचा नैवेद्य सरस्वतीला दाखवायचा.8 / 8८. खिचडीचा नैवेद्यही सरस्वतीला अतिप्रिय असतो, असे म्हणतात. त्यामुळे बंगालमध्ये वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वतीला खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो. त्याला ते खिचुरी असं म्हणतात. भाज्या टाकून आपण जशी मसाला खिचडी करतो, त्याप्रमाणेच बंगाली लोकंही डाळ- तांदूळाची खिचडी करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications