Join us   

मध्यरात्री अचानक भूक लागून जाग येतेय?... ७ हेल्दी स्नॅक्स... मध्यरात्रीच्या भुकेसाठी उत्तम पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2022 4:06 PM

1 / 8
आजकालच्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे आपल्या जेवणाच्या, झोपण्याच्या सगळ्याच वेळा बदलल्या आहेत. कधी कधी आपण काम करण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी रात्र - रात्र जागतो, किंवा दिवसा झोप घेऊन पूर्ण रात्र काम करत बसतो.अशावेळी आपल्याला रात्री अचानक भूक लागते. आपल्यापैकी काही लोकांना रात्रीच्या जेवणांनंतरही मध्यरात्री भूक लागते किंवा काहीतरी खाण्याची इच्छा होते. मग आपण पोट भरण्यासाठी किचनमधील सगळे डबे धुंडाळतो. भुकेच्या नादात पोट भरण्यासाठी आपण जे मिळेल ते खातो. परंतु अशा अवेळी काहीतरी अरबट - चरबट खाल्ल्याने आपले पोट बिघडते किंवा अपचन होते. मग ही भूक भागविण्यासाठी नेमकं खायचं तरी काय ? मध्यरात्री लागणाऱ्या भूकेवर हेल्दी स्नॅक्स कोणते आहेत समजून घेऊयात(7 Snacks To Satiate Your Midnight Cravings).
2 / 8
मखाणा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. एक पॅन घेऊन मंद आचेवर हे मखाणे भाजून घेऊन हवाबंद डब्यात भरून ठेवा. जर कधी अचानक तुम्हाला रात्री भूक लागली तर रोस्टेड मखाणे हा भूक भागविण्यासाठी उत्तम पर्याय आहे. हे खाल्ल्याने तुमचं वजनही वाढणार नाही व भूकही भागेल.
3 / 8
झालमुरी हे कुरमुरे आणि मसाले यांच्यापासून तयार होणारे कोलकाता स्ट्रीट फूड आहे. कांदा, टोमॅटो, उकडलेला बटाटा, काकडी, शेव, कुरमुरे, फरसाण, लाल तिखट, मसाले, शेंगदाणे, हिरवी मिरची टाकून केलेली ही स्ट्रीट स्टाईल रेसिपी मध्यरात्री तुमचे पोट भरण्यास मदत करेल.
4 / 8
नाचणीचे चिप्स हे आरोग्यासाठी फार हेल्दी असतात. मध्यरात्री भूक लागल्यावर तुम्ही हे चिप्स खाऊ शकता. हे चिप्स तळलेलं नसून भाजलेले असावेत या गोष्टीकडे लक्ष द्या.
5 / 8
मध्यरात्री काम करता करता जर तुम्हाला झोप येत असेल तर ही झोप घालविण्यासाठी तुम्ही चहा, कॉफी ऐवजी ग्रीन टी पिऊ शकता. ग्रीन टी मध्ये मध आणि दालचिनी सारखे फ्लेवर्स उपलब्ध असतात. गरम ग्रीन टी प्यायल्याने कामाचा ताण काही काळासाठी नाहीसा होईल व परत काम करण्यासाठी तुम्ही फ्रेश व्हाल.
6 / 8
जर तुमच्या घरात काहीच स्नॅक्स उपलब्ध नसतील तर फळ खाण हा एक चांगला पर्याय आहे. कोणत्याही स्नॅक्सपेक्षा फळ खाणं हे केव्हाही आरोग्याला फायदेशीर ठरू शकत.
7 / 8
काजू, बदाम, अक्रोड, मनुका, जर्दाळू, पिस्ता यांसारखे ड्रायफ्रुटस तुम्ही मध्यरात्रीच्या भुकेसाठी खाऊ शकता. यामध्ये प्रोटीन, फायबरच प्रमाण खूप जास्त असत. यामुळे तुमची भूक भागेल व शरीराला आवश्यक प्रोटीनही मिळतील.
8 / 8
मटार आपण जेवणात भाजीच्या स्वरूपात खातो. परंतु मध्यरात्री अचानक भूक लागल्यास तुम्ही मटार चाट देखील खाऊ शकता. मटार हलकेच उकडून घेऊन मग त्यात तुमच्या आवडीनुसार कांदा, टोमॅटो, पापडी, हिरवी चटणी, खजुराची चटणी घालून खाऊ शकता.
टॅग्स : अन्न