फळांवर जे स्टिकर्स चिटकवलेलेे असतात, त्यांचा अर्थ काय? तुम्ही नक्की काय पाहून फळं घेणं योग्य, वाचा...
Updated:February 24, 2025 12:36 IST2025-02-22T20:06:50+5:302025-02-24T12:36:28+5:30
What does the number on a fruit sticker mean : Stickers On Fruits : Facts About Fruit Stickers You Did Not Know : फळांवर चिटकवलेल्या स्टिकर्सवरील आकड्यांचा नेमका अर्थ काय ते पाहूयात.

बाजारांत फळं विकत घेताना आपण या फळांवर वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर्स (What does the number on a fruit sticker mean) चिकटवलेले पाहतो. या स्टिकर्सवर (Stickers On Fruits) एक बारकोड आणि काही आकडे असतात. परंतु हे स्टिकर्स का चिकटवले जातात, किंवा यावर असणाऱ्या आकड्यांचा नेमका अर्थ काय, याचा विचार आपण फारसा करत नाही.
या फळांवरील स्टिकर्सचं त्या फळांची क्वालिटी, गुणवत्ता सांगतात. एवढंच नाही ( Facts About Fruit Stickers You Did Not Know) तर हे फळ कोणत्या देशात पिकवले गेले आहे, त्यावर कीटकनाशकांची फवारणी केली आहे का, फळं ऑरगॅनिक आहेत का अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर या स्टिकर्समध्येच लपलेली असतात. यासाठीच फळांवर चिटकवलेल्या स्टिकर्सवरील आकड्यांचा नेमका अर्थ काय ते पाहूयात.
१. ५ अंकी संख्या ज्याची सुरुवात ९ या अंकापासून होते :-
ज्या फळांवर ५ अंकी संख्या असते ज्याची सुरुवात ९ या अंकापासून होते ती फळं उत्तम दर्जाची असतात. शक्यतो, ऑरगॅनिक पद्धतीने पिकवलेल्या तसेच कोणत्याही प्रकारच्या खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर न केलेली उत्तम दर्जाची फळे असे त्याचा अर्थ होतो. अशी चांगल्या क्वालिटीची फळं बाजारांत थोड्या महाग किंमतीला विकली जातात.
२. ५ अंकी संख्या ज्याची सुरुवात ८ या अंकापासून होते :-
ज्या फळांवर ५ अंकी संख्या असते ज्याची सुरुवात ८ या अंकापासून होते ती फळं थोडी हलक्या दर्जाची असतात. अशा स्टिकर्स चिटकवलेल्या फळांवर वेगवेगळ्या कीटकनाशकांची फवारणी केलेली असते. यामुळे अशी कीटकनाशकांची फवारणी केलेली फळे बाजारांत दुय्यम दर्जाची किंवा कीटकनाशकांची फवारणी करुन तयार केलेली म्हणून विकली जातात.
३. ४ अंकी संख्या ज्याची सुरुवात ३ या अंकापासून होते :-
ज्या फळांवर ४ अंकी संख्या ज्याची सुरुवात ३ या अंकापासून होते याचा अर्थ त्या फळांवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया केलेल्या असतात. क्ष - किरण, इरॅडेशन यांसारख्या अनेक प्रक्रिया करुन हे फळ आपल्या पर्यंत पोहोचवले जाते. नाशवंत फळ दीर्घकाळ टिकवण्यासाठी फळांवर अशा वेगवेगळ्या प्रक्रिया केलेल्या असतात. अशी फळ आपण खाऊ शकतो परंतु त्यातील नैसर्गिक पोषणमूल्य या सगळ्या प्रक्रिया केल्याने कमी होतात.
४. फक्त ४ अंकी संख्या :-
ज्या फळांवर फक्त ४ अंकी आकडे असतात अशी फळ खाण्याच्या दृष्टीने फार धोकादायक असतात. कारण अशा फळांवर भरपूर प्रमाणात हानिकारक केमिकल्सयुक्त कीटकनाशक, खते, वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक फवारणी केलेली असते. ही फळं ७० % केमिकल्सयुक्त रसायनांचा वापर करूनच पिकवली जातात. त्यामुळे शक्यतो अशी फळ खाणे टाळावेच.
५. फळं विकत घेताना लक्षात ठेवा :-
यासाठीच बाजारांतून फळं विकत घेताना शक्यतो त्यावर चिटकवलेले स्टिकर्स आणि संख्या तपासून मगच फळं विकत घ्यावी.