संत्री खाल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'हे' ५ पदार्थ; पोटाचे त्रास, इन्फेक्शनला वेळीच लांब ठेवा
Updated:January 18, 2023 16:05 IST2023-01-18T15:33:58+5:302023-01-18T16:05:22+5:30
What should you not eat with an orange : संत्री खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नयेत ते या लेखात समजून घेऊया.

हिवाळ्यात कमीत कमी किमतीत ताजी संत्री पाहायला मिळतात. संत्री व्हिटामीन सी चा चांगला स्त्रोत आहे. पण खाताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. (Fruits you should not have together) संत्री खाल्ल्यानंतर काही पदार्थांचे सेवन टाळायला हवे. अन्यथा अनेक तब्येतीच्या समस्या उद्भवू शकतात. संत्री खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नयेत ते या लेखात समजून घेऊया.
भेंडी
काही लोकांना भाज्या खाल्ल्यानंतर फळे खाण्याची सवय असते. संत्र्यानंतर भेंडीचे सेवन चुकूनही करू नये. अन्यथा यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. (Do not eat these 5 foods after eating oranges)
पान
संत्री खाल्ल्यानंतर पान खाऊ नये. सुपारी पान खाल्ल्याने छातीत जडपणा येतो तसेच फुफ्फुसाचा त्रास होऊ शकतो.
पपई
संत्री खाल्ल्यानंतर पपईचे सेवन करू नये. पपईचे सेवन केल्याने लूज मोशनची समस्या उद्भवू शकते.
मध
संत्री खाल्ल्यानंतर मधाचे सेवनही करू नये, अन्यथा त्याचा पचनक्रियेवर नकारात्मक परिणाम होतो. काही लोक संत्र्याचा रस मधात मिसळून पितात, पण हे मिश्रण रक्तातील साखर वाढवू शकते.
दूध
संत्री खाल्ल्यानंतर लगेचच दुधाचं सेवन करू नका.