Join us   

नेहमीच विकतचं दही खाता? आरोग्यासाठी ते कितपत चांगलं? दही विकत आणताना ३ गोष्टी तपासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2024 5:31 PM

1 / 7
दही विकत आणून खाणाऱ्यांचं प्रमाण सध्या खूप वाढलं आहे. कारण दही खाण्याचा तो सगळ्यात सोपा उपाय आहे.(which curd is more healthy- Homemade or Store-Bought Dahi? )
2 / 7
घरी दही लावायचं म्हटलं की त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. शिवाय घरी लावलेलं दही विकत मिळणाऱ्या दह्यासारखं घट्ट, चवदार होत नाही. त्यामुळे अनेकांना विकतचं दहीच आवडतं.
3 / 7
विकतचं दही खाणं चांगलं की घरी केलेलं दही खाणं चांगलं याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी amitagadre या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
4 / 7
यामध्ये त्या सांगत आहेत की जर तुम्ही घरी तयार केलेलं दही जर खात असाल तर ते एक उत्तम प्रोबायोटीक आहे. हे दही जास्त शिळं न होऊ देता २ दिवसांत संपवलं पाहिजे.
5 / 7
घरी तयार केलेलं दही खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे या दह्यात कोणतेही केमिकल्स आणि प्रिझर्व्हेटीव्ह नसतात.
6 / 7
जर तुम्ही विकतचं दही खात असाल तर मात्र त्याची एक्सपायरी डेट तपासून घ्या.
7 / 7
तसेच विकतचं दही घेताना त्यामध्ये ५ ग्रॅमपेक्षा जास्त साखर नाही ना हे देखील तपासून घ्या. जास्त साखर असणारं विकतचं दही खाणं टाळा.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती