लाल की पांढरा...कोणता कांदा आरोग्यासाठी जास्त फायदेशीर? ९० टक्के लोकांना माहीत नसेल फरक...

Updated:April 3, 2025 18:22 IST2025-04-03T17:04:19+5:302025-04-03T18:22:03+5:30

Red Onion Vs White Onion Health Benefits: लोक नेहमीच कन्फ्यूज होतात की, कोणते कांदे घ्यावे किंवा कोणत्या कांद्यानं अधिक फायदे मिळतात. तुम्हालाही याबाबत कन्फ्यूजन असेल तर याचं उत्तर आज आम्ही सांगणार आहोत.

लाल की पांढरा...कोणता कांदा आरोग्यासाठी जास्त फायदेशीर? ९० टक्के लोकांना माहीत नसेल फरक...

Red Onion Vs White Onion Health Benefits: उन्हाळा आला की, जास्तीत जास्त लोक जेवणासोबत कच्चे कांदे खातात. तसंही कांद्याशिवाय कोणतीही भाजी किंवा पदार्थ बेचव लागते. कांद्यानं टेस्ट तर वाढतेच सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. बाजारात सामान्यपणे लाल आणि पांढऱ्या रंगाचे कांदे मिळतात. पण लोक नेहमीच कन्फ्यूज होतात की, कोणते कांदे घ्यावे किंवा कोणत्या कांद्यानं अधिक फायदे मिळतात. तुम्हालाही याबाबत कन्फ्यूजन असेल तर याचं उत्तर आज आम्ही सांगणार आहोत.

लाल की पांढरा...कोणता कांदा आरोग्यासाठी जास्त फायदेशीर? ९० टक्के लोकांना माहीत नसेल फरक...

हेल्‍थलाईननुसार, कोणत्याही प्रकारच्या कांद्यामध्ये भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्, सल्फर, फायबर, मिनरल्स आणि इतरही अनेक व्हिटॅमिन्स असतात. जे कॅन्सरसहीत वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करतात. इतकंच नाही तर आपली हाडं, ब्लड शुगर, ब्लड प्रेशरसाठी फायदेशी असतात.

लाल की पांढरा...कोणता कांदा आरोग्यासाठी जास्त फायदेशीर? ९० टक्के लोकांना माहीत नसेल फरक...

लिव्ह स्‍ट्रॉन्‍गनुसार, लाल किंवा पांढरे कांदे जेव्हाही दोन्हींमधील फरकाचा विषय येतो तेव्हा लाल कांद्यात अधिक अॅंटी-ऑक्सिडेंट आढळतात. लाल कांद्यामध्ये एन्‍टोसियानेन नावाचं अॅंटीं-ऑक्सिडेंट असतं जे कांद्याला लाल रंग देतं. हेच शरीरातील अनकंट्रोल सेलची वाढ थांबवतं. ज्यामुळे पोट, ब्रेस्‍ट, प्रोस्‍टेट कॅन्सरचा धोका कमी होतो.

लाल की पांढरा...कोणता कांदा आरोग्यासाठी जास्त फायदेशीर? ९० टक्के लोकांना माहीत नसेल फरक...

2014 मध्ये करण्यात आलेल्या एका शोधानुसार, पीसीओडीनं पीडित महिलांनी जेव्हा 8 आठवडे लाल कांदा खाल्ला तेव्हा त्यांची लक्षणं कमी आढळून आलीत आणि बॅड कोलेस्टेरॉलही कमी झालं. सोबतच लाल कांद्यामध्ये कॅलरी कमी असतात आणि यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि पोटॅशिअमही भरपूर असतं.

लाल की पांढरा...कोणता कांदा आरोग्यासाठी जास्त फायदेशीर? ९० टक्के लोकांना माहीत नसेल फरक...

लाल आणि पांढऱ्या कांद्यातील कॅलरीबाबत सांगायचं तर 100 ग्रॅम कच्च्या लाल कांद्यात 37 कॅलरी आणि पांढऱ्या कांद्यात 42 कॅलरी असतात. म्हणजे पांढऱ्या कांद्यात कॅलरी जास्त असतात. अशात लाल कांदा वजन कमी करण्यास मदत करतो.

लाल की पांढरा...कोणता कांदा आरोग्यासाठी जास्त फायदेशीर? ९० टक्के लोकांना माहीत नसेल फरक...

फायबरबाबत सांगायचं तर सगळ्याच कांद्यांमध्ये फायबर भरपूर अतं आणि फायबर ब्‍लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यास, ब्‍लड क्‍लॉटिंग दूर करण्यास, हृदयरोग, डायबिटीसचा धोका कमी करण्यास, वजन कमी करण्यास मदत करतं.

लाल की पांढरा...कोणता कांदा आरोग्यासाठी जास्त फायदेशीर? ९० टक्के लोकांना माहीत नसेल फरक...

लाल असो वा पांढरे दोन्ही कांद्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे शरीराची इम्यूनिटी वाढते आणि वेगवेगळ्या आजारांपासून बचाव होतो. तसेच शरीरात पाण्याचं संतुलनही कायम राहतं.

लाल की पांढरा...कोणता कांदा आरोग्यासाठी जास्त फायदेशीर? ९० टक्के लोकांना माहीत नसेल फरक...

एक्सपर्ट्सनुसार, जर रोजचा आहार योग्य असला तर उष्माघातापासून बचाव करता येऊ शकतो. नॅशनल हेल्थ पोर्टलवर असलेल्या एका माहितीनुसार, लोकांनी उन्हाळ्यात ताजी फळं, भाज्या आणि ज्यूसचं सेवन केलं पाहिजे. यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण बरोबर राहतं. ज्यामुळे शरीराला डिहायड्रेशनपासून बचाव करण्यास मदत मिळते. शरीरात पाणी कमी झालं तर उष्माघाताचा धोका जास्त राहतो.