वजन कमी करायचं म्हणून बेचव का खाता? ५ पौष्टिक झटपट पदार्थ, वजन कमी आणि चव जबरदस्त By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2022 4:03 PM 1 / 7'वजन कमी करणे हे खरंच खायचं काम नाही', असं आपण अनेक वेट लॉस करणाऱ्या लोकांकडून ऐकलं असेलच. मन मारून अनेक जण आपल्या आवडत्या पदार्थांकडे दुर्लक्ष करत, फक्त वाफवलेल्या भाज्या खातात. परंतु, आपण वेट लॉस करत असताना अनेक चविष्ट पदार्थ खाऊ शकता. पौष्टिक आहारसह व्यायाम देखील तितकंच महत्त्वाचं आहे. व्यायामासह हे ५ पदार्थ खा. जेणेकरून तुमच्या जिभेचे चोचले देखील पुरवले जातील. यासह त्यातील पौष्टिक तत्वे आपल्या शरीरात समाविष्ट होईल.2 / 7बहुतेकांना असं वाटत की केळी खाल्याने वजन वाढते. पण जर केळी, अक्रोड आणि अंजीरमध्ये दूध मिसळून स्मूदी प्यायली, तर तुमचे वजन लवकर कमी होईल. ही स्मुदी प्यायल्याने लवकर भूक लागत नाही. यासह केळी, अक्रोड आणि अंजीर यामधील पौष्टिक घटक शरीरासाठी लाभदायक ठरतात.3 / 7प्रथिनेयुक्त उकडलेले चणे आणि दहीपासून बनवलेली चाट, वजन कमी करण्यासाठी उत्तम रेसिपी आहे. या रेसिपीसाठी फक्त काही उकडलेले चणे आणि दही मिसळून यामध्ये तुमचा आवडता मसाला किंवा चाट मसाला मिसळा आणि याचा आनंद घ्या. संध्याकाळची छोटी भूक मिटवण्यासाठी ही रेसिपी उपयुक्त ठरेल.4 / 7वजन कमी करण्यासाठी ओट्स हा एक उत्तम पर्याय आहे. ओट्समध्ये दही मिसळल्याने ते खूप चविष्ट लागतात. त्यासाठी ओट्स दह्यामध्ये भिजवा आणि तुमच्या आवडत्या चिरलेल्या भाज्यांसोबत मिक्स करा. यात मीठ, भाजलेले जिरे पावडर आणि लाल तिखट घालून तुमचा ओट्स-दही मसाला तयार आहे.5 / 7सफरचंदमध्ये फायबर असते जे खाल्ल्यानंतर लवकर भूक नाही लागत. तुम्ही सफरचंद आणि पालक मिसळून हिरव्या सफरचंदाची स्मूदी बनवू शकता हे तुमचं वजन कमी करण्यास मदत करेल. आणि चवीलाही उत्तम लागते.6 / 7एक केळी, चार बदाम, दूध, दही आणि दालचिनी पावडर मिक्स करून तुम्ही स्मूदी अगदी सहज तयार करू शकता. हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून स्मूदी बनवा. ही स्मूदी वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. या स्मुदीचा नियमित आहारामध्ये समावेश करा.7 / 7डाळ खूप फायदेशीर असते कारण त्यात प्रोटीन असते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. पण अनेकवेळा आपण घरी बनवलेल्या डाळीला तेल किंवा तूपाची फोडणी देतो, यामुळे वजन वाढते. फोडणी न घालता डाळीचं सेवन करा. हवे असल्यास त्यात आवडत्या मासालेंचा समावेश करून डाळ खावा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications