World Sandwich Day : सँडविच आवडतं ना, हे पहा जगभरात फेमस भन्नाट सँडविच! पाहून तोंडाला पाणी सुटेल.. Published:November 3, 2021 11:42 AM 2021-11-03T11:42:44+5:30 2021-11-03T12:29:12+5:30
सँडविच हा झटकन होणारा आणि पटकन खाता येईल असा पदार्थ म्हणावा तर हेल्दी आणि पोटभरीचा. जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या या पदार्थाविषयी खास आजच्या दिवशी जाणू घेऊ... आज (३ नोव्हेंबर) जागतिक सॅंडविच डे जगभरात साजरा केला जातो. १७६२ मध्ये इंग्लंडमध्ये जॉन मोंटाज य़ांच्यामुळे सँडविचला प्रसिद्धी मिळाली आणि हा पदार्थ अस्तित्वात आला. भारतात मागील काही वर्षांपासून सँडविचला विशेष महत्त्व आले आहे. घाईच्या वेळी पटकन तयार होणारे आणि हेल्दी म्हणून या पदार्थाकडे पाहिले जाते. तसेच सँडविचमध्ये चीज, पनीर, मायोनिज यांसारखे दुग्धजन्य पदार्थही असतात. त्यामुळे त्याचे पोषणमूल्य आणखी वाढते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
सँडविचमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सलाड वापरत असल्यामुळे इतर जंकफूडपेक्षा हेल्दी पर्याय म्हणून सँडविचचा विचार केला जातो. यामध्ये लेट्यूस, काकडी, बीट, टोमॅटो, बटाटा, गाजर, कांदा यांसारख्या भाज्यांचा प्रामुख्याने वापर होतो. परदेशात या पदार्थाला विशेष महत्त्व असून शाकाहारी सँडविचपेक्षा मांसाहारी पदार्थांचे सँडविच याठिकाणी जास्त प्रमाणात खाल्ले जाते. त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे सॉस, चिज, मायोनिज दिले जाते.

सँडविचसाठी वापरण्यात येणारा ब्रेड हा देशानुसार बदलतो. जगात सगळीकडे प्रामुख्याने मैद्याचा ब्रेड वापरला जातो. याशिवाय हल्ली व्हीट ब्रेड, होल ग्रेन ब्रेड, तीळ लावलेला ब्रेड असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड वापरले जातात.
भारतात सँडविचमध्ये टोमॅटो सॉस, हिरवी चटणी, लाल चटणी, अमूल बटर असे सगळे लावायची पद्धत आहे. तसेच यामध्ये क्लब, ग्रिल्ड, टोस्ट असे वेगवेगळे प्रकारही पाहायला मिळतात. तसेच या सँडविचसोबत फ्रेंच फ्राइज, एखादे कोल्डड्रींक असे दिले जाते.
सँडविच हा पोटभरीचा पदार्थ असल्याने तो सकाळच्या नाश्त्याला, एखादवेळी दुपारच्या जेवणाला, संध्याकाळी चहासोबत आणि रात्रीचे जेवण म्हणून असा दिवसाच्या कोणत्याही वेळेत सहज खाता येईल असा पदार्थ आहे. तसेच एखाद्या ठिकाणी घाईने पोहोचायचे असेल किंवा अगदी ट्रीपला जायचे असेल तरी उपलब्ध पदार्थांमध्ये पटकन होणारा आणि सोबत सहज कॅरी करता येईल असा हा पदार्थ भारतात बराच प्रसिद्ध झाला आहे.
आता या सँडविचमध्ये चायनिज, पंजाबी प्रकारची भाजी घातलेले, पावभाजी सँडविच, वेफर्स सँडविच, कॉर्न सँडविच असे असंख्य प्रकार मिळतात. चॉकलेट सँडविच, आइस्क्रीम सँडविच हे नव्याने शोध लागलेले प्रकारही भारतात विशेष प्रसिद्ध आहेत. दोन ब्रेडच्या पारंपरिक सँडविचशिवाय ४ ते ६ ब्रेडचे सँडविचही आता अनेक ठिकाणी पाहायला मिळते.
सँडविच हा पोटभरीचा पदार्थ असल्याने तो सकाळच्या नाश्त्याला, एखादवेळी दुपारच्या जेवणाला, संध्याकाळी चहासोबत आणि रात्रीचे जेवण म्हणून असा दिवसाच्या कोणत्याही वेळेत सहज खाता येईल असा पदार्थ आहे.