Join us   

जागतिक सॅण्डविच डे : पोटभरीचे आणि चमचमीत - स्वस्तात मस्त सॅण्डविचचे ८ प्रकार, सांगा तुम्हाला कोणते आवडते ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2023 9:00 AM

1 / 9
पौष्टीक भाज्या आणि चीजचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेले सँडविच सगळ्यांनाच फार प्रिय असते. याच सँडविचचा आज वाढदिवस आहे असे म्हणावे लागेल. आज ३ नोव्हेंबर जागतिक सॅंडविच डे संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. सँडविच म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येतं ते मस्तपैकी दोन ब्रेडमध्ये भाज्या घातले भरपूर बटर, टोमॅटो सॉस आणि वरून शेव भुरभुरून सर्व्ह केलेला पदार्थ. सकाळ असो संध्याकाळ सँडविच हा असा पदार्थ आहे जो कोणत्याही वेळी खाल्ला तरी चालतो. अगदी आपण टिफीनमध्येही सँडविच घेऊन जाऊ शकता किंवा डिनरसाठीही करू शकता. काहीजणांना चहासोबत सँडविच आवडतं. थोडक्यात काय तर सँडविच हा झटपट होणारा आणि पोटभरीचा पौष्टिक पदार्थ आहे. खरंतर सँडविचमध्ये भरपूर प्रकार पाहायला मिळतात. सँडविच बनवण्याच्या विविध पद्धतीही आहेत(World Sandwich Day: Classic Sandwiches You Must Try).
2 / 9
व्हेजिटेबल सँडविच हा आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा व आवडता सँडविचचा कॉमन प्रकार आहे. दोन ब्रेड स्लाईसच्या मध्ये काकडी, टोमॅटो, बटाटा, भोपळी मिरची, बीटरुट, कांदा किंवा आपले आवडते व्हेजिटेबल घालून ते सँडविच बनवले जाते.
3 / 9
या सुपर टेस्टी बॉम्बे ग्रील सँडविचशिवाय मुंबईचे स्ट्रीट फूड अपूर्णच आहे. मसालेदार बटाट्याची भाजी त्यावर काकडी, टोमॅटोचे तुकडे, कांदा आणि सिमला मिरचीच्या रिंग्सच्या स्वादिष्ट मिश्रणाने भरलेले हे सँडविच खायला चविष्ट लागते. तसेच, हिरवी चटणी आणि इतर मसाले वापरल्याने या सँडविचची चव उत्तम लागते. सगळे पदार्थ सँडविचमध्ये भरुन त्याला बाहेरून बटर लावून ते मस्त कुरकुरीत होईपर्यंत ग्रील केले जाते.
4 / 9
नेहमीच्या सँडविचपेक्षा हा थोडा वेगळा प्रकार आहे. त्यामुळे हे पौष्टिक सँडविच खायला अतिशय चविष्ट लागते. क्रिम सँडविच हा प्रकार अमेरिकेत जास्त प्रसिद्ध आहे. मुख्य म्हणजे हे सँडविच बनवणं खूपच सोपं आहे. स्लाईस ब्रेड, टोमॅटो, क्रिम, बारीक चिरलेला कोबी, गाजर, हिरवी चटणी, काळी मिरी पावडर, बटर, बारीक चिरलेली कोंथिबीर असे पदार्थ वापरून हे क्रिम सँडविच तयार केले जाते.
5 / 9
चॉकलेट चीज सँडविच हा बच्चे कंपनीचा आवडता स्नॅक्स प्रकार आहे. ज्याला ते कधीही नाही म्हणत नाहीत. नेहमीच्या सँडविचप्रमाणे यात भाज्या नाहीतर चॉकलेट, बटर चीजचा वापर केला जातो.
6 / 9
व्हेज मेयोनीज सँडविच हा सँडविचचा फारच पौष्टिक स्नॅक्सचा प्रकार आहे. हे सँडविच खाल्ल्यावर त्यात असणाऱ्या मेयोनीज मधून योग्य ते न्यूट्रीशनही मिळते आणि भूकही भागते. याचबरोबर मेयोनीज घातल्यामुळे मोठ्यांसोबतच मुलंही आवडीने हे सँडविच खातात. ब्रेड स्लाईसला बटर प्रमाणेच मेयोनीज लावून त्यात आपले आवडते व्हेजिटेबल घालून आपण झटपट हे सँडविच तयार करु शकतो.
7 / 9
आता या सँडविचमध्ये चायनिज, पंजाबी प्रकारची भाजी घातलेले, पावभाजी सँडविच, वेफर्स सँडविच, कॉर्न सँडविच असे असंख्य प्रकार मिळतात. चॉकलेट सँडविच, आइस्क्रीम सँडविच हे नव्याने शोध लागलेले प्रकारही भारतात विशेष प्रसिद्ध आहेत. दोन ब्रेडच्या पारंपरिक सँडविचशिवाय ४ ते ६ ब्रेडचे सँडविचही आता अनेक ठिकाणी पाहायला मिळते. यासोबतच ब्रेड स्लाईसच्यामध्ये चटपटीत मसालेदार न्युडल्सचे स्टफिंग भरून नूडल्स सँडविच देखील आवडीने खाल्ले जाते.
8 / 9
जर तुम्हाला नेहमीच्या सँडविचच्या रेसिपीचा कंटाळा आला असेल, तर आपण रोजच्या सँडविचला एक मेकओव्हर देण्यासाठी ब्रेड मलाई सँडविचमध्ये ब्रेडच्या स्लाइसवर लावल्या जाणार्‍या ताज्या क्रिमचा (दुधापासून) वापर करु शकतो. कोलकात्यातील रस्त्यांवरील ठेल्यावरील ब्रेड मलाई सँडविच हे फारच प्रसिद्ध आहे.
9 / 9
सकाळच्या नाश्त्यासाठी हा सँडविचचा एक उत्तम प्रकार आहे. जेव्हा आपल्याकडे नाश्ता बनवण्यासाठी वेळ नसतो. तेव्हा हा पर्याय उत्तम आहे. यासाठी फक्त काकडी, टोमॅटो, सिमला मिरची आणि कांदा या भाज्या चिरून घ्याव्यात. चाट मसाला आणि दही घालून सर्व जिन्नस मिक्स करा. ते सॅण्डविचच्या स्लाइसमध्ये भरुन खाण्यासाठी सर्व्ह करावे.
टॅग्स : अन्न