World Vada Pav Day 2022 : गरमागरम, खमंग वडापाव घरीच १० मिनिटात करा; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

Published:August 23, 2022 11:41 AM2022-08-23T11:41:15+5:302022-08-23T12:20:37+5:30

World Vada Pav Day 2022 : घरच्याघरी सोप्या पद्धतीनं परफेक्ट वडापाव बनवण्याची रेसेपी पाहूया. ही डीश बनवणं खूप सोपं आहे. आधी बटाटे उकळवून त्यात मसाले घालून मिश्रण तयार केले जाते.

World Vada Pav Day 2022 : गरमागरम, खमंग वडापाव घरीच १० मिनिटात करा; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

भुक लागल्यानंतर पटकन काहीतरी खायचं म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे वडापाव. अगदी कमीत कमी पैश्यात भूक भागवणारा एकमेव प्रसिद्ध नाश्ता म्हणजे वडापाव. वडापाव आणि चहाशी निगडीत प्रत्येकाच्याच काही आठवणी असतात. आवडीनुसार चटण्या, मिरच्या पावावर घालून बटाटावड्यांचा आनंद घेण्याची मजा काही वेगळीच. खासकरून पावसाळ्यात खूप लोक बटाटेवडे खातात. आज जागतिक जागतीक वडापाव दिन (World Vada Pav Day 2022) सर्वत्र साजरा केला जात आहे.

World Vada Pav Day 2022 : गरमागरम, खमंग वडापाव घरीच १० मिनिटात करा; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

या निमित्तानं घरच्याघरी सोप्या पद्धतीनं परफेक्ट वडापाव बनवण्याची रेसेपी पाहूया. ही डीश बनवणं खूप सोपं आहे. आधी बटाटे उकळवून त्यात मसाले घालून मिश्रण तयार केले जाते. यानंतर बटाट्यावर बेसन तळून हिरवी चटणी सोबत सर्व्ह करू शकता. (Batata Vada Easy and Quick Recipe How to make batata vada)

World Vada Pav Day 2022 : गरमागरम, खमंग वडापाव घरीच १० मिनिटात करा; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

500 ग्रॅम बटाटे, मिश्रण तयार करण्यासाठी साहित्य: 5 ग्रॅम मोहरी, 5 ग्रॅम हळद, 3 ग्रॅम लाल तिखट, 10 ग्रॅम लाल तिखट, 10 ग्रॅम आले, 10 ग्रॅम लसूण, 1 लिंबू, कोथिंबीर

World Vada Pav Day 2022 : गरमागरम, खमंग वडापाव घरीच १० मिनिटात करा; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

कोटिंगसाठी 200 ग्रॅम बेसन पाणी, 5 ग्रॅम लाल तिखट, 5 ग्रॅम हळद, 3 ग्रॅम जिरे, मीठ, 2 ग्रॅम सोडा बाय कार्ब

World Vada Pav Day 2022 : गरमागरम, खमंग वडापाव घरीच १० मिनिटात करा; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

सर्व प्रथम बटाटा उकळवा आणि त्याची साल काढून टाका. नंतर कुस्करून घ्या

World Vada Pav Day 2022 : गरमागरम, खमंग वडापाव घरीच १० मिनिटात करा; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

दुसरीकडे हिरवी मिरची, आले, लसूण आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.

World Vada Pav Day 2022 : गरमागरम, खमंग वडापाव घरीच १० मिनिटात करा; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

नंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी , कढीपत्ता, हळद, मिरची घाला.

World Vada Pav Day 2022 : गरमागरम, खमंग वडापाव घरीच १० मिनिटात करा; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

यानंतर फोडणीत बटाटे घालून एकजीव करून घ्या

World Vada Pav Day 2022 : गरमागरम, खमंग वडापाव घरीच १० मिनिटात करा; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

त्याचे छोटे छोटे गोळे करून तयार बेसन पिठात घोळवा. कोटिंगचं मिश्रण जास्त पातळ नसेल याची काळजी घ्या.

World Vada Pav Day 2022 : गरमागरम, खमंग वडापाव घरीच १० मिनिटात करा; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

यानंतर वडे तळून घ्या आणि चटणीबरोबर सर्व्ह करा.