4 Tips for rose plants to bloom, homemade fertilizer for rose plant, How to take care of rose plant?
गुलाबाला भरभरून फुलं येतील, फक्त ४ गोष्टी करा, कधीही बिनाफुलाचं राहणार नाही रोपPublished:March 26, 2024 05:06 PM2024-03-26T17:06:56+5:302024-03-26T17:14:16+5:30Join usJoin usNext गुलाबाच्या झाडाला टपोरी फुलं आलेली दिसली की ते पाहूनच मन कसं प्रसन्न होऊन जातं. छान रंगबिरंगी फुलांशिवाय गुलाबाच्या रोपाला शोभा नाहीच. पण कधी कधी गुलाबाचं रोप नुसतंच वाढत जातं. त्याला फुलंच येत नाहीत. असं तुमच्याही गुलाबाच्या बाबतीत झालं असेल तर या काही गोष्टी तपासून पाहा. गुलाबाच्या रोपाला भुसभुशीत माती लागते. त्यामुळे गुलाबाच्या झाडाला खूप पाणी टाकणं टाळा. माती कोरडी पडल्यावरच त्याला पाणी द्या. गुलाबाच्या फांद्यांची छाटणी नियमितपणे व्हायलाच पाहिजे. नियमितपणे छाटणी झाल्यास रोप डेरेदार होईल आणि त्याला भरपूर फुलं येतील गुलाबाच्या रोपासाठी नेहमी मध्यम आकाराची म्हणजे २० इंची घेर असणारी किंवा त्यापेक्षाही मोठी कुंडी वापरावी. लहान कुंडीत रोपाची चांगली वाढ होत नाही. गुलाबाला भरपूर फुलं येण्यासाठी त्याला केळीच्या सालींचं पाणी नियमितपणे द्यावं. कारण केळीच्या सालांमध्ये असणारं पोटॅशियम फुलं येण्यासाठी उपयुक्त ठरतं. टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीGardening TipsPlantsWater