गुलाबाला भरभरून फुलं येतील, फक्त ४ गोष्टी करा, कधीही बिनाफुलाचं राहणार नाही रोप By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2024 5:06 PM 1 / 6गुलाबाच्या झाडाला टपोरी फुलं आलेली दिसली की ते पाहूनच मन कसं प्रसन्न होऊन जातं. छान रंगबिरंगी फुलांशिवाय गुलाबाच्या रोपाला शोभा नाहीच.2 / 6पण कधी कधी गुलाबाचं रोप नुसतंच वाढत जातं. त्याला फुलंच येत नाहीत. असं तुमच्याही गुलाबाच्या बाबतीत झालं असेल तर या काही गोष्टी तपासून पाहा. 3 / 6गुलाबाच्या रोपाला भुसभुशीत माती लागते. त्यामुळे गुलाबाच्या झाडाला खूप पाणी टाकणं टाळा. माती कोरडी पडल्यावरच त्याला पाणी द्या.4 / 6गुलाबाच्या फांद्यांची छाटणी नियमितपणे व्हायलाच पाहिजे. नियमितपणे छाटणी झाल्यास रोप डेरेदार होईल आणि त्याला भरपूर फुलं येतील5 / 6गुलाबाच्या रोपासाठी नेहमी मध्यम आकाराची म्हणजे २० इंची घेर असणारी किंवा त्यापेक्षाही मोठी कुंडी वापरावी. लहान कुंडीत रोपाची चांगली वाढ होत नाही.6 / 6गुलाबाला भरपूर फुलं येण्यासाठी त्याला केळीच्या सालींचं पाणी नियमितपणे द्यावं. कारण केळीच्या सालांमध्ये असणारं पोटॅशियम फुलं येण्यासाठी उपयुक्त ठरतं. आणखी वाचा Subscribe to Notifications