कुंडीतल्या रोपांना घाला ४ प्रकारचं पाणी, सुकलेली रोपेही होतील टवटवीत आणि बहरतील फुलांनी
Updated:October 11, 2024 18:00 IST2024-10-11T16:42:34+5:302024-10-11T18:00:41+5:30

आपण आपली बाग खूप हौशीने फुलवतो. पण तरीही कधी कधी रोपं सुकून जातात. किंवा आपल्याला हवी तशी आपली रोपं छान हिरवीगार, टवटवीत होत नाहीत.
अशावेळी तुमच्या बागेतल्या रोपांना इतर कोणतंही केमिकलयुक्त खत घालण्यापेक्षा हे ४ प्रकारचं घरगुती खत तयार करा. एरवी आपण ते निरुपयोगी म्हणून टाकून देतो. पण तेच आपल्या बागेसाठी संजीवनी ठरतं. ते खत नेमकं कोणतं, याविषयीची माहिती walkwithnature या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. (4 types of homemade water fertilizer for the fast growth of plants)
सगळ्यात पहिला उपाय म्हणजे केळीच्या सालींचे पाणी. केळीची सालं पाण्यामध्ये ८ ते १० तास भिजत घाला. त्यानंतर गाळून घेऊन ते पाणी रोपांना द्या.
खडू पाण्यात भिजत घाला आणि ते पाण्यात व्यवस्थित विरघळू द्या. त्यानंतर त्या पाण्यात आणखी थोडं पाणी घाला आणि ते थोडं थोडं करून रोपांना घाला.
तिसरा उपाय म्हणजे चहा पावडरचे पाणी. चहा केल्यानंतर गाळणीमध्ये जमा झालेली चहा पावडर थोड्या पाण्यात भिजत घाला. त्यानंतर हे पाणी रोपांना द्या. रोपं जोमाने वाढतील.
चौथा उपाय म्हणजे मोहरीचं तेल काढल्यानंतर जो चोथा उरतो तो ८ ते १० तासांसाठी पाण्यात भिजत घाला. त्यानंतर तो गाळून घ्या आणि ते पाणी रोपांना द्या. हा उपाय थोडा अवघड आहे कारण शहरीभागात मोहरीचा चोथा सहजासहजी मिळणे शक्य नाही. पण कधी तो मिळाला तर रोपांसाठी हा उपाय करायला विसरू नका.