5 air purifier plants, 5 plants that gives more oxygen, air purifier plants for home decoration
घरातली हवा शुद्ध करणारी 'ही' रोपं तुमच्याकडे आहेत का? कुबट वास गायब, घर कायम प्रसन्न आणि सुरक्षितPublished:November 8, 2024 02:36 PM2024-11-08T14:36:58+5:302024-11-08T15:01:46+5:30Join usJoin usNext काही रोपं अशी असतात की जी इतर रोपांपेक्षा जरा जास्त प्रमाणात ऑक्सिजन सोडतात (5 plants that gives more oxygen). त्यामुळे त्या रोपांना नॅचरल एअर प्युरिफायर प्लांट्स किंवा मग हवा शुद्ध करणारी रोपं म्हणून ओळखली जातात. ही रोपं आपण आपल्या घरात आवर्जून ठेवायलाच हवीत.(5 air purifier plants) त्यापैकी सगळ्यात पहिलं आहे मनीप्लांट. खूप जास्त काळजी न घेताही जोमाने वाढणारं रोप म्हणजे मनी प्लांट. पीस लीली हे देखील एक हवा शुद्ध करणारं रोपटं आहे. घर सजावटीसाठी त्याचा खूप छान वापरही करता येतो. कमीतकमी काळजी घेऊनही हिरवंगार राहणारं एक रोप म्हणजे एरिका पाम. हे रोप तुमच्या हॉलमध्ये, बेडरुममध्ये जरूर ठेवा. स्नेक प्लांटदेखील नॅचरल एअर प्युरिफायर म्हणून ओळखलं जातं. यामध्ये उंच आणि ठेंगणी अशा दोन जाती असतात. तुमच्या घरातली जागा पाहून तुम्ही त्या रोपांची निवड करू शकता. रबर प्लांट देखील इतर रोपांच्या तुलनेत भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देतं. फक्त वरील रोपांच्या तुलनेत रबर प्लांटची थोडी विशेष काळजी घ्यावी लागते.टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्ससुंदर गृहनियोजनगृह सजावटGardening TipsPlantsHomeHome Decoration