केळ्याचं साल फेकून देता? केळ्याच्या सालीनं ५ कामं होतील सोपी, रोपाला फुलंही भराभर येतील

Published:August 20, 2024 05:10 PM2024-08-20T17:10:51+5:302024-08-20T18:13:53+5:30

5 Amazing Uses Of Banana Peels : केळ्याच्या सालीत एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार राहण्यास मदत होते.

केळ्याचं साल फेकून देता? केळ्याच्या सालीनं ५ कामं होतील सोपी, रोपाला फुलंही भराभर येतील

केळी (Banana) हे फळ पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. खूप कमी लोकांना हे माहिती असते की केळ्याचे सालही गुणकारी ठरते. केळ्याच्या सालीचा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही वापर करू शकता. ज्यामुळे घरातील कठीण कामं सोपी होण्यास मदत होते.

केळ्याचं साल फेकून देता? केळ्याच्या सालीनं ५ कामं होतील सोपी, रोपाला फुलंही भराभर येतील

केळ्याची सालं त्वचेसाठीसुद्धा फायदेशीर ठरतात. केळ्याच्या सालीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. याचा वापर तुम्ही घरातल्या अनेक कामांमध्ये करू शकता.

केळ्याचं साल फेकून देता? केळ्याच्या सालीनं ५ कामं होतील सोपी, रोपाला फुलंही भराभर येतील

केळ्याच्या सालीत एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार राहण्यास मदत होते. तुम्ही हळूहळू त्वचेवर हे साल रगडू शकता किंवा केळीच्या सालीची पेस्ट चेहऱ्याला लावू शकता. ज्यामुळे डाग,जळजळ कमी होण्यास मदत होईल.

केळ्याचं साल फेकून देता? केळ्याच्या सालीनं ५ कामं होतील सोपी, रोपाला फुलंही भराभर येतील

केळ्याच्या सालीचा उग्र वास डासांना आणि किटकांना अजिबात आवडत नाही. केळ्याची सालं कापून अशा ठिकाणी ठेवा जिथे किडे जास्त येतात. बाल्कनी किंवा स्वंयपाकघराजवळ ठेवू शकता.

केळ्याचं साल फेकून देता? केळ्याच्या सालीनं ५ कामं होतील सोपी, रोपाला फुलंही भराभर येतील

केळ्याच्या सालीने तुम्ही शूज चमकवू शकता. यासाठी केळ्याच्या सालीचा आतला भाग बुटांवर रगडा नंतर कापडाने बुट स्वच्छ करा.

केळ्याचं साल फेकून देता? केळ्याच्या सालीनं ५ कामं होतील सोपी, रोपाला फुलंही भराभर येतील

केळ्याच्या सालीत पोटॅशियम असते जे झाडांसाठी फार फायदेशीर ठरते. केळ्याची सालं सुकवून नंतर मातीत मिसळा. ज्यामुळे झाडांची चांगली वाढ होते.

केळ्याचं साल फेकून देता? केळ्याच्या सालीनं ५ कामं होतील सोपी, रोपाला फुलंही भराभर येतील

केळ्याच्या सालीत एंटीबॅक्टेरिअल गुण असतात ज्यामुळे दात स्वच्छ होण्यास मदत होते. सालीच्या आतल्या भागाने दात रगडून स्वच्छ करा.