Join us

खूप काळजी न घेताही झटपट वाढणाऱ्या ५ वेली- बाग होईल हिरवीगार- दिसेल छान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2025 18:37 IST

1 / 6
कुंडीमध्ये एखादा वेल लावला आणि तो चढण्यासाठी छानशी मांडणी करून दिली तर नक्कीच बागेला शोभा येऊन ती अधिक हिरवीगार होऊन जाते. म्हणूनच आता असे काही वेल पाहूया जे अगदी झटपट वाढतात आणि बागेला खूप छान लूक देतात.
2 / 6
पहिला वेल आहे गोकर्णाचा. गोकर्णाचा वेल वाढण्यासाठी त्याची कोणतीही विशेष काळजी घ्यावी लागत नाही. हा वेल भराभर वाढत जातो तसेच निळ्याशार फुलांनी छान शोभून दिसतो.
3 / 6
दुसरा आहे वेली गुलाब. हा गुलाब वेगवेगळ्या रंगात मिळतो. अनेक ठिकाणी तर भिंतीवर, गेटवर तो चढवला जातो. त्याला येणारी फुलं आकाराने थोडी लहान असतात, पण खूप आकर्षक दिसतात.
4 / 6
लाल, गुलाबी रंगाची नाजूक फुलं येणारा गणेशवेलही खूप लवकर वाढतो. त्या वेलीची फुलं एवढी आकर्षक असतात की हिरव्यागर्द वेलीवर ती लगेच उठून दिसतात.
5 / 6
मनी प्लांट देखील खूप लवकर वाढतो. तो खालून वर चढविण्यापेक्षा नेहमी वरून खाली उतरू द्यावा. तसे केल्याने तो अधिक जलद वाढतो.
6 / 6
निळ्या- जांभळ्या रंगाची फुलं येणारा मॉर्निंग ग्लोरी हा वेलही खूप वेगात वाढतो. फक्त त्याला खूप जास्त पाणी घालू नये.
टॅग्स : बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स