बाल्कनीत वर्षभर रंगबेरंगी फुलं हवी? ५ रोपं लावा- सुंदर फुलांनी नेहमीच सजलेली राहील बाग By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2024 2:46 PM 1 / 6काही लोकांना फुलझाडांची खूपच आवड असते. तुम्हालाही तशीच आवड असेल आणि तुमच्या बाल्कनीचा किंवा बागेचा एखादा कोपरा फुलझाडांनी भरून टाकायचा असेल तर या काही रोपांची निवड करा2 / 6वर्षभर फुलंं देणारं रोप म्हणजे ऑफिस टाईम. हिवाळ्यात याला येणाऱ्या फुलांचं प्रमाण वाढतं. उन्हाळ्यात थोडं कमी होतं, पण फुल मात्र नक्की येतात.3 / 6दुसरं आहे छोटे चिनी गुलाब. अगदी छोट्याशा कुंडीतही तुम्ही ते लावू शकता. गुलाबी, केशरी, पिवळा, पांढरा अशा वेगवेगळ्या रंगात ते येतं.4 / 6तिसरं म्हणजे लँटिना. लँटिनाला जांभळी, गुलाबी, केशरी, पांढरी अशी वेगवेगळ्या रंगाची सुंदर नाजूक फुल येतात. एखाद्या ऋतूमध्ये फुलांचं प्रमाण कमी होतं. पण मोठा खंड मात्र पडत नाही. 5 / 6जास्वंदाचं रोपही बारमाही फुल देणार आहे. वेगवेगळ्या रंगाची जास्वंद आणून तुम्ही कुंडीत सजवू शकता. 6 / 6इझोराला देखील नेहमीच फुलं येतात. आणि ती फुलं गुच्छाने येतात. त्यामुळे ते रोप आणखीच छान बहरलेलं दिसतं. आणखी वाचा Subscribe to Notifications