1 / 7उन्हाळ्यात संध्याकाळच्यावेळी घराबाहेर थोडं गार वाटतं. म्हणून आपण बाल्कनीमध्ये, अंगणात, गच्चीवर जाऊन बसतो. पण तिथे गेल्यावर डास कडाकड चावून त्रास देतात. 2 / 7म्हणूनच तुमच्या अंगणात, बाल्कनीमध्ये, गच्चीवर डासांना पळवून लावणारी ही काही रोपं लावा.. या रोपांच्या वासामुळे डास दूर पळून जातात. म्हणूनच या रोपांना mosquito repellent Plants म्हणून ओळखले जाते. ती रोपं नेमकी कोणती ते पाहूया..3 / 7पुदिन्याच्या वासानेही डास दूर पळून जातात. त्यामुळे बागेत लहान- लहान कुंड्यांमध्ये पुदिना लावून ठेवा. डास तर दूर पळून जातीलच पण स्वयंपाकातही तुम्हाला पुदिना उपयोगी येईल.4 / 7डासांना पळवून लावण्यासाठी रोजमेरीचाही उपयोग होताे. रोजमेरीच्या रोपाला गरम आणि उष्ण, कोरडं वातावरण पाहिजे असतं. रोजमेरीचा उपयोग तुम्हाला केसांच्या वाढीसाठीही होऊ शकतो. 5 / 7गवती चहाचा उपयोगसुद्धा डासांना पळवून लावण्यासाठी होतो.6 / 7झेंडूच्या वासानेही डास दूर पळून जातात. शिवाय झेंडूच्या टपोऱ्या फुलांमुळे तुमच्या बाल्कनीचं सौंदर्यही अधिक खुलतं..7 / 7लँटिना या छोट्याशा रोपाला खूप सुंदर फुलं येतात. पिवळा, निळा, हिरवा, लाल, केशरी, पांढरा अशा अनेक रंगात ही फुलं मिळतात. ही रोपं तुमच्या बाल्कनीत लावा. त्याच्यातून येणाऱ्या वासामुळे डास आजुबाजुला फिरकत नाहीत.