गार्डनिंगसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या ५ वस्तू तुमच्याकडे असायलाच पाहिजेत- काम होईल सोपं..

Published:November 28, 2022 04:52 PM2022-11-28T16:52:17+5:302022-11-28T16:56:44+5:30

गार्डनिंगसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या ५ वस्तू तुमच्याकडे असायलाच पाहिजेत- काम होईल सोपं..

१. गार्डनिंग करणं म्हणजेच आपल्या घराभोवती छोटीशी पण आकर्षक बाग फुलवणं ही देखील एक कलाच आहे. कोणतं झाड कसं लावायचं, आपल्या बागेत ते कसं ठेवायचं, त्याची काळजी कशी घ्यायची या प्रत्येकाचाच अतिशय बारीक विचार करावा लागतो.

गार्डनिंगसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या ५ वस्तू तुमच्याकडे असायलाच पाहिजेत- काम होईल सोपं..

२. शिवाय गार्डनिंग म्हणजे काही सोपं काम नाही. बाग मेंटेन करायची तर आठवड्यातून एकदा खास वेळ देऊन झाडांची विशेष काळजी घेऊन झाडांची कटींग, स्वच्छता, खत देणे अशी कामं करावीच लागतात. म्हणूनच तर बागेतलं तुमचं अवघड काम सोपं व्हावं म्हणून गार्डनिंगसाठी गरजेच्या ठरणाऱ्या या काही वस्तू तुमच्या घरात असायलाच पाहिजेत.

गार्डनिंगसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या ५ वस्तू तुमच्याकडे असायलाच पाहिजेत- काम होईल सोपं..

३. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्टी म्हणजे झाडांना पाणी घालण्याची झारी. अशी जाळीदार झारी असली की झाडांना अलगद पाणी मिळते. शिवाय या झारीतून पाणी शिंपडल्यास पानांवरची धुळ निघून जाते आणि झाडे आणखी फ्रेश, हिरवीगार दिसतात.

गार्डनिंगसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या ५ वस्तू तुमच्याकडे असायलाच पाहिजेत- काम होईल सोपं..

४. तुमच्या बागेत जर तुम्ही आर्टिफिशियल लॉन टाकलं असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी, झाडण्यासाठी अशा पद्धतीचा झाडू वापरणे गरजेचे आहे. या झाडूमुळे लॉनवरचा कचरा चटकन झाडता येतो. शिवाय दोरे, धागे, केस जरी लॉनवर पडले असतील, तरी ते लगेचच ब्रशमध्ये अडकून निघून जातात.

गार्डनिंगसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या ५ वस्तू तुमच्याकडे असायलाच पाहिजेत- काम होईल सोपं..

५. ठराविक अंतराने झाडांची कटींग करावीच लागते. ही कटींग व्यवस्थित व्हावी आणि त्यातून झाडांची पुढची वाढ चांगली व्हावी, यासाठी तुमच्याकडे खास गार्डनिंग कात्री असणं गरजेचं आहे. त्यामुळे गार्डनिंगच्या वेगवेगळ्या कात्री नेहमी घरी ठेवा.

गार्डनिंगसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या ५ वस्तू तुमच्याकडे असायलाच पाहिजेत- काम होईल सोपं..

६. छोटंसं खुरपं किंवा Hand Trowel हेदेखील खूप गरजेचं आहे. गार्डन छोटंसं असलं तरी त्याची गरज पडतेच. झाडांना खत देताना त्याच्य आजुबाजुची माती खाली- वर करावीच लागते. त्यासाठी या छोट्या खुरप्याचा किंवा हॅण्ड ट्रॉवेलचा खूप उपयोग होतो. कुंडीत माती भरण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.

गार्डनिंगसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या ५ वस्तू तुमच्याकडे असायलाच पाहिजेत- काम होईल सोपं..

७. काटेरी झाडांची देखरेख करताना चांगल्या प्रतीचे गार्डनिंग ग्लोव्ह्ज हातात असणं कधीही चांगलंच.