5 Plants that brings positivity, luck, prosperity, good fortune in your house
घरात लावा ही ५ Good Luck झाडं, घर नेहमीच राहील पॉझिटीव्ह- आनंदीPublished:December 21, 2023 02:43 PM2023-12-21T14:43:10+5:302023-12-21T14:49:44+5:30Join usJoin usNext आपल्याकडे तुळशीला जसं धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं, आरोग्यदायी झाड म्हणून ओळखलं जातं, तसंच इतर काही झाडांनाही गुड लक प्लांट्स म्हटलं जातं. ही काही झाडं घरात असली की घरात सकारात्मकता, समृद्धी आणि आनंद वाढतो, असं म्हणतात. म्हणूनच आता अशी काही गुड प्लांट्स नेमकी कोणती ते पाहूया.... यातलं सगळ्यात पहिलं आहे मनी प्लांट. मनी प्लांटचे अनेक प्रकार आहेत. त्यातलं कोणतंही एक घरात असावं. दुसरं आहे स्नेक प्लांट. स्नेक प्लांट त्याच्या आसपासचे विषारी कण आणि ॲलर्जेटिक घटक शोषून घेते, असं म्हणतात. पिंपळाच्या बोन्साय झाडालाही गुड लक प्लांट म्हणून ओळखलं जातं. सकारात्मकता वाढविण्यासाठी ते उपयुक्त ठरतं, असं मानतात. बांबू प्लांट नेहमी घराच्या दिवाणखान्यात ठेवावं. या झाडाची पानं कुत्रा, मांजर या पाळीव प्राण्यांच्या आरोग्यासाठी चांगली नसतात. त्यामुळे असे प्राणी घरात असतील तर बांबू प्लांट घरात ठेवू नये. किंवा या प्राण्यांच्या संपर्कात ते येणार नाही, याची काळजी घ्यावी. पॉझिटीव्ह एनर्जी आणि गुडलकसाठी झेड प्लांट (Jade Plant) ओळखलं जातं. टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्ससुंदर गृहनियोजनGardening TipsPlantsHome