5 types of magical water for plant growth, tips and tricks for fast plant growth
कुंडीतल्या रोपांना द्या ५ प्रकारचे 'जादुई' पाणी; रोपं बहरून जातील- फुलंही भरपूर येतीलPublished:September 4, 2024 01:06 PM2024-09-04T13:06:48+5:302024-09-04T13:18:39+5:30Join usJoin usNext आपण झाडांना वेळोवेळी पाणी देतो. त्यांना पुरेसं ऊन मिळेल याची काळजीही घेतो. पण तरीही बऱ्याचदा असं होतं की रोपांची आपल्याला अपेक्षित असते तशी वाढ होत नाही. ऐन पावसाळ्यातही आपली बाग छान फुलून येत नाही. (gardening tips) असं तुमच्याही झाडांच्या बाबतीत होत असेल तर झाडांना या ५ प्रकारचे पाणी घाला (5 types of magical water for plant growth). यामुळे रोपांची भरभरून वाढ तर होईलच, पण फुलझाडांना फुलंही खूप येतील. हा उपाय केल्यास तुम्हाला झाडांना इतर कोणतेही रासायनिक खत देण्याची गरज पडणार नाही. हा उपाय amazing_garden_99 या instagram पेजवर शेअर करण्यात आला आहे. (tips and tricks for fast plant growth) रोपांची वाढ चांगली होत नसेल तर लसूण पाकळ्या ग्लासभर पाण्यात रात्रभर भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी झाडांना द्या. त्यातून झाडांना भरपूर फॉस्फरस मिळेल. रोपांना फुलं येत नसतील तर त्यांना तांदळाचे पाणी म्हणजेच राईस वॉटर घाला. त्यातून मिळणारे पोटॅशियम रोपांना भरपूर फुले येण्यासाठी उपयुक्त ठरते. रोपांची वाढ होत नसेल तर सोयाबीनचे पाणी उपयुक्त ठरू शकते. त्यातून योग्य प्रमाणात नायट्रोजन मिळते. यासाठी मूठभर सोयाबीन १ लीटर पाण्यात रात्रभर भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी झाडांना द्या. पानं पिवळी पडत असतील, त्यांच्यावर चमक नसेल तर लिंबाच्या फोडी करा. त्या रात्रभर एक ते दीड लीटर पाण्यात भिजत घाला आणि ते पाणी झाडांच्या पानांवर शिंपडा. तसेच थोडेसे मातीतही घाला. १ कप दुधामध्ये दिड ते दोन लीटर पाणी टाका आणि हे मिल्क वॉटर झाडांना द्या. यामुळे मातीची पीएच पातळी संतुलित राहाते आणि त्यामुळे रोपांची चांगली वाढ होण्यास मदत होते.टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सफुलंपाणीGardening TipsPlantsFlowerWater