Join us

तुमच्या घरात जेड प्लांट असायलाच हवं, कारण....; वाचा जेड प्लांट घरात असण्याचे ६ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2025 13:27 IST

1 / 8
आपल्याकडे मनी प्लांट, तुळस यासारखी काही रोपं अशी आहेत ज्यांना लकी प्लांट (lucky plants) म्हणून ओळखलं जातं.
2 / 8
त्या रोपांपैकी एक आहे जेड प्लांट (6 amazing benefits of jade plant). जेड प्लांटला फेंगशुईनुसार तर 'symbol of prosperity' म्हणून ओळखलं जातं.(why we should keep jade plant at home?)
3 / 8
जेड प्लांट भरपूर प्रमाणात ऑक्सिजन सोडतं आणि त्याच्या आसपासची हवा शुद्ध ठेवण्यासाठी मदत करतं.
4 / 8
जेड प्लांट तुम्ही तुमच्या सोयीनुसार इनडोअर, आऊटडोअर म्हणून वापरू शकता. त्यामुळे गरजेनुसार, जागेनुसार त्याला हलवणं खूप सोयीस्कर ठरतं.
5 / 8
जेड प्लांट तुम्ही तुमच्या हॉलच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवलं तरी तुमच्या घरातला तो कोपरा एकदम हिरवागार आणि फ्रेश होऊन जातो. त्यामुळे होम डेकोर म्हणून ते खूप चांगल्या पद्धतीने वापरता येतं.
6 / 8
जेड प्लांटची खूप काळजी घेण्याची गरज नसते. कमीतकमी लक्ष देऊनही ते खूप चांगलं वाढतं. त्यामुळे ज्यांना गार्डनिंगची आवड आहे पण रोपांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, अशांसाठी ते एक चांगला पर्याय आहे.
7 / 8
जेड प्लांटला खूप जास्त पाणी घालण्याची गरज नसते. त्यामुळे तुम्ही अधूनमधून त्याला पाणी घालायला विसरलात तरी काही होत नाही.
8 / 8
जेड प्लांटमध्ये काही औषधी गुणधर्मसुद्धा आहेत. पिंपल्स कमी करण्यासाठी काही ठिकाणी जेड प्लांटची पानं वापरली जातात.
टॅग्स : बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीगृह सजावट