6 best indoor water plants, how to decorate house using water plants, how to grow water plants?
बाल्कनीत कुंड्या ठेवायला जागा नाही? घरात बाटलीमध्ये पाण्यात लावा 'ही' रोपं, मातीची गरजच नाहीPublished:November 12, 2024 04:21 PM2024-11-12T16:21:10+5:302024-11-12T16:30:11+5:30Join usJoin usNext हल्ली फ्लॅट संस्कृती वाढली आहे. आता फ्लॅट म्हटलं की बाल्कनी खूपच लहान असते. तिथे आपण आपली गार्डनिंगची हौस भागवू शकत नाही. म्हणूनच तुम्हालाही बाल्कनीमध्ये जास्त कुंड्या ठेवायला जागा नसेल तर सरळ घरात वेगवेगळ्या आकाराच्या बाटल्या आणा आणि त्यात वेगवेगळे इनडोअर वॉटर प्लांट्स लावा. बघा तुमचं घर कसं छान सजून हिरवंगार होईल. या रोपांना वाढण्यासाठी मातीही लागत नाही. सगळ्यात पहिलं इनडोअर वॉटर प्लांट आहे मनी प्लांट. मनी प्लांट पाण्यात लावला तरी तो खूप छान वाढतो. इनडोअर प्लांटसाठी क्षार जास्त असणारं पाणी वापरू नये. जर क्षार जास्त असतील तर बाटलीमध्ये पाणी भरून ठेवा आणि एक ते दोन दिवसांनी त्यात रोप लावा. बांबू प्लांट तर वॉटर प्लांट म्हणूनच ओळखलं जातं. घरात सकारात्मक उर्जा येण्यासाठी अनेक जण आवर्जून घरात बांबू प्लांट ठेवतात. कमीतकमी काळजी घेऊनही भरपूर वाढणारं रोपं म्हणजे स्पायडर प्लांट. हे एखाद्या छोट्याशा बाटलीत किंवा मटक्यात खूप छान वाढू शकतं. पीस लीली हे देखील एक इनडोअर वॉटर प्लांट म्हणून ओळखलं जातं. पर्पल हर्ट प्लांटही पाण्यात छान वाढते. याचा रंग जांभळट गुलाबी असल्याने ते इतरांपेक्षा निश्चितच वेगळे आणि आकर्षक वाटते स्नेक प्लांट देखील पाण्यात छान वाढते. एखादा हा प्रयोग करून पाहा. जर पाण्यात स्नेक प्लांट लावणार असाल तर त्याची अखूड प्रजाती निवडा.टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीगृह सजावटGardening TipsPlantsWaterHome Decoration