मोगरा फुलला! पाटीवर लिहिण्याचा खडू करेल कमाल, पांढऱ्याशुभ्र कळ्यांचा बहर - सुगंध दरवळेल दारी...
Updated:April 15, 2025 09:05 IST2025-04-15T09:00:00+5:302025-04-15T09:05:06+5:30
Use This 2 Rupees Thing To Grow Your Jasmine Plant Mogra Growth Tips Home Gardening & Fertilizer : 6 Tips For The Blooming Of Mogra Plant : which is the best fertilizer for jasmine or mogra plant : अंगणातील मोगऱ्याच्या रोपाला फुलंच येत नसतील तर करुन पाहा स्वस्तात मस्त उपाय...

घराच्या अवतीभोवती किंवा बाल्कनीत फुल झाडं लावल्याने ( which is the best fertilizer for jasmine or mogra plant) घराचे सौंदर्य अधिकच खुलते. फुलझाडांमध्ये जास्वंद, गुलाबाच्या रोपाबरोरबच मोगऱ्याचं रोपंही लावलं जातं.
काहीवेळा या रोपाची व्यवस्थित काळजी (6 Tips For The Blooming Of Mogra Plant) घेऊनही, व्यवस्थित वाढ होत नाही किंवा रोपाला फुलंच येत नाही, रोपं सुकतात अशावेळी आपण नेमकं काय करु शकतो ते पाहा.
१. मोगरा अशावेळी फुलतो जेव्हा त्याला व्यवस्थित ऊन मिळते. मोगरा फक्त १ ते २ तास उन्हात ठेवून चालत नाही तर ५ ते ६ तासांच्या उन्हात ठेवल्यानंतर तुम्हाला फरक दिसून येईल.
२. मोगऱ्याच्या कुंडीतल्या मातीमध्ये एक- दोन खडू खोचून ठेवा. याचबरोबर, आपण खडूची बारीक पूड करून देखील मातीत मिसळू शकतो. यामुळे रोपाला कॅल्शियम मिळून त्याची जास्त चांगली वाढ होेईल.
३. जेव्हा मोगऱ्याच्या कुंडीमध्ये तुम्ही माती भरत असाल तेव्हा ती माती पाणी घट्ट धरून ठेवणारी नको. मोगऱ्याच्या रोपाची माती नेहमीच भुसभुशीत आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. त्यासाठी मातीमध्ये थोडं कोकोपीट, गांडूळ खत आणि थोडीशी वाळू एकत्र करून मगच कुंडी भरा.
४. मोगऱ्याच्या रोपाला कधीही खूप जास्त पाणी घालू नये. माती ओलसर राहील एवढं पाणी त्याला पुरेसं असतं. त्यामुळे नेहमी अंदाज घेऊनच मोगऱ्याला पाणी घाला.
५. मेथी दाण्यांची पावडर आणि हळद २: १ या प्रमाणात एकत्र करा आणि मोगऱ्याच्या कुंडीतल्या मातीमध्ये एक चमचा घाला. हे मोगऱ्यासाठी खूप चांगलं खत आहे. १५ दिवसांतून एकदा हा उपाय करा. मोगऱ्याला भरपूर फुलं येतील.
६. मोगऱ्याचे रोप कोमेजू लागत असेल तर ऑर्गेनिक खत तयार करण्यासाठी मातीत गाईचे शेणं घालू शकता. यात तुम्ही एप्सम सॉल्टचा वापर करू शकता.