ना माती ना कुंडीचा पसारा; घरात ठेवा पाण्यात वाढणाऱ्या ७ औषधी वनस्पती, आरोग्य राहील उत्तम By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 8:00 PM 1 / 8घरात झाडं, फुलांची रोप ठेवायला सर्वांनाच आवडते. पण व्यवस्थित काळजी घेणं शक्य नसतं म्हणून अनेकजण घरात झाडं ठेवणं टाळतात. (Indoor Plants) अशावेळी तुम्ही पाण्यात वाढणाऱ्या औषधी वनस्पती घरात ठेवू शकता. ज्यामुळे घराची शोभा वाढेल आणि जास्त पसाराही होणार नाही. (Easy Beautiful Plants That Will Grow in Water)2 / 8पुदिन्याचे रोप वाढवण्यासाठी तुम्हाला माती लागणार नाही. रोपाची छोटी कटींग घ्या आणि एका काचेच्या बरणीत ठेवा. तळाची पानं काढून टाका. पाण्यात पुदिन्याचे रोप पटापट वाढेल.3 / 8 अनेक घरांमध्ये तुळस कुंडीत वाढवली जाते पण तुम्ही कुंडीत लावण्याऐवजी पाण्यातही वाढवू शकता. तुळशीच्या रोपाची काही देठं काढून पाण्यात ठेवा. त्यानंतर पाणी बदलत राहा.4 / 84 ते ५ इंचाचे ऑर्गनोचे कटिंग घ्या आणि ते पाण्यात लावा. ३ ते ४ दिवसांनी याचे पाणी बदलत राहा. पाण्याच्या बाटलीतील रोप कधीतरी हलक्या उन्हात ठेवत राहा.5 / 8या झाडाला लकी प्लांट असंही म्हटलं जातं. बांबू प्लांट तुम्हाला कोणत्याही नर्सरीत मिळेल. बांबू प्लांटसाठी जास्त पाणीही लाग नाहीत. एका काचेच्या पॉटमध्ये तुम्ही हे झाडं ठेवू शकता.6 / 8मॉन्सेरा आपल्या हिरव्या रंगाच्या आकर्षक कट असलेल्या पानांसाठी लोकप्रिय आहे. यासाठी तुम्ही घरातील टेबलवर टॉप प्लांटरच्या रूपात ठेवू शकता. हे एक सुंदर शोव्ह चे प्लांट आहे. जे तुम्ही ऊन्हात ठेवू शकता. 7 / 8या झाडाची पानं लांबच लांब असतात. हे एक इन्डोअर झाड आहे. जे तुम्ही कमी सुर्यप्रकाशात ठेवू शकता. हे झाड घरात ठेवल्यास शोभा वाढेल आणि सकारात्मक वातावरण राहील.8 / 8मनी प्लांटला लकी प्लांट असंही म्हटलं जातं. हे झाड एकावेली प्रमाणे वाढत जाते. पाण्याच्या बॉटलमध्येमध्ये तुम्ही हे झाड ठेवू शकता. ऊन्हात ही पानं जळण्याची शक्यता असते. याशिवाय तुम्ही हँगिंग प्लांटमध्येही लावू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications