1 / 10या रोपांची जपणूक करण्यासाठी कष्टही कमी लागतात. पदार्थ स्वत:हून उगवून वापरण्याचा आनंद काही औरच आहे. 2 / 10ही घ्या रोपांची यादी. गॅलरी मस्त भरून जाईल.3 / 10आजकाल रोजमेरीचा वापर प्रचंड प्रमाणात होतो. तिची किंमत आकाशाला टेकायला फार वेळ लागणार नाही. पण घरी रोजमेरीचे रोप लावणे फार सोपे आहे. विकत आणलेल्या चांगल्या कोंबा पासून गॅलेरीतच रोप लावा. 4 / 10आपण रोजच कडीपत्ता वापरतो. भाजीवाल्याशी वाद घालून फुकटात कडीपत्ता घेतो. त्यापेक्षा घरीच रोप लावा. कडीपत्ता एकदा का फुलला की, त्याचा तो पसरत जातो.5 / 10हिरवी मिरचीचे रोप घरात वाढवणे अगदीच सोपे आहे. बियांपासूनही घरीच रोप तयार करता येते किंवा विकतही आणू शकता.6 / 10तुळस तर प्रत्येकाच्या दारात असावीच. अत्यंत औषधी असते. तसेच प्रसन्न असते. बियांपासून रोप नेहमीच्या पद्धतीनेच तयार करता येते.7 / 10गोकर्णाची फुले प्रचंड औषधी असतात. वजन कमी करण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो. गोकर्णाचे रोप कोणत्याही नर्सरीत आरामात मिळेल . ते आणून वाढवा. फार काही काळजी घ्यावी लागत नाही.8 / 10कोरफड केसांपासून त्वचेपर्यंत सगळ्यावरतीच गुणकारी आहे. अगदी लहानशा जागेतही ती व्यवस्थित वाढते. वेळोवेळी वाळलेली कोरफड वेगळी करा. बाकी पाणीही कमी लागते आणि काळजीही.9 / 10चहामध्ये घालायलाच नाही तर, केसांसाठी सुद्धा गवती चहा चांगला असतो. घरी त्याचे रोप वाढवणे अत्यंत सोपे आहे. रोजच्या चहासाठी घरचाच गवती चहा वापरा. 10 / 10सर्व रोपांना योग्य सूर्यप्रकाश, पाणी आणि कटिंग करा. खतांचा वापर करा. माती बदलत राहा. मग बघा रोपं कशी छान वाढतील.