पहिल्यांदाच कुंडीत रोपं लावताय? लक्षात ठेवा ७ टिप्स, रोपांना वाढताना बघण्याचा आनंद मोठा...
Updated:January 26, 2025 08:01 IST2025-01-26T06:22:37+5:302025-01-26T08:01:19+5:30
When gardening for the first time, you should consider the following : Tips for First-Time Gardeners : 7 Top Gardening Tips for Beginners : गार्डनिंग येत नाही किंवा पहिल्यांदाच करत असाल तर काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा...

आपल्यापैकी बऱ्याचजणांना छंद किंवा आवड म्हणून गार्डनिंग ( Tips for First-Time Gardeners ) करायला फार आवडते. परंतु गार्डनिंग कसे करावे? त्यात नेमकं काय करायचं किंवा इतर अनेक संबंधित (7 Top Gardening Tips for Beginners ) गोष्टींबद्दलची फारशी माहिती आपल्याला नसते. आपल्यापैकी काहीजणांना गार्डनिंगचा चांगला अनुभव आणि माहिती असते. परंतु जे पहिल्यांदाच गार्डनिंग करत आहेत, किंवा ज्यांना गार्डनिंग कसे करायचे माहित नाही अशासाठी काही खास टिप्स.
१. प्रत्येक वनस्पतीच्या स्वतःच्या अशा वेगवेगळ्या गरजा असतात. तुम्ही ज्या भागात राहता त्या भागातील स्थानिक हवामान आणि मातीच्या प्रकाराला अनुकूल अशा रोपांची निवड करा. मनी प्लांट किंवा तुळस यांसारख्या सहज वाढणाऱ्या वनस्पतींची लागवड करून गार्डनिंगला सुरुवात करा.
२. जास्त पाणी घालणे किंवा चुकीच्या वेळी पाणी देणे रोपांसाठी हानिकारक ठरु शकते. सूर्यप्रकाश खूप प्रखर होण्यापूर्वी रोपांना ओलावा शोषण्यास मदत करण्यासाठी सकाळी लवकर पाणी द्या. कुंडीतील वरची १ ते २ इंचाची माती बोटाने तपासून पाहा, माती कोरडी वाटली यातच पाणी घाला.
३. एकाचवेळी अनेक प्रकारची रोप खरेदी करु नका. रोपांची काळजी घेणं हळूहळू जमू लागल्यावर इतर रोपं खरेदी करुन त्यांची योग्य लागवड करा.
४. सुरुवातीला आकाराने लहान कुंड्यांची किंवा भांड्यांची निवड करा. जेणेकरुन ते एका जागेवरुन दुसरीकडे हलवणे सोपे राहील. खिडकीच्या ग्रीलमध्ये किंवा घराच्या छोट्याशा बगीच्यात ठेवता येईल अशाच कुंड्यांची निवड करा.
५. माणसांप्रमाणेच रोपांनाही ग्रूमिंगची गरज असते तुमची रोपं ताजी फ्रेश दिसण्यासाठी आणि रोपाच्या इतर भागांमध्ये कीटक किंवा रोगांचा प्रसार टाळण्यासाठी नियमितपणे मृत किंवा खराब झालेली पाने कापून टाका.
६. सूर्यप्रकाश हा रोपांसाठी आवश्यक आहे, परंतु सर्वांना सम प्रमाणात सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. प्रत्येक रोपाला किती सूर्यप्रकाशाची गरज आहे हे समजून घ्या - काहींना सूर्यप्रकाश लागतो तर काहींना सावली आवश्यक असते. त्यांना अशा ठिकाणी ठेवा जिथे रोपं उत्तम प्रकारे वाढतात.
७. अतिशय चांगल्या प्रकारे गार्डनिंग येण्यासाठी संयम आणि वेळ लागतो. या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची घाई करू नका. तुम्ही घेतलेल्या काळजीने तुमची रोपे वाढतात. त्यामुळे रोपांची वाढ होताना पाहण्याचा आनंद घ्या.