Join us

मिरचीचं रोप लगडेल हिरव्यागार मिरच्यांनी, ‘हा’ चमचाभर पदार्थ फक्त आठवड्यातून एकदा खत म्हणून घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2025 18:43 IST

1 / 8
रोजच्या वापराचे असे अनेक खाद्य पदार्थ असतात ज्यांचे रोप किंवा झाड आपल्याला घरीच लावता येते. ताजे अन्न चवीलाही छान लागते आणि पौष्टिकही जास्त असते.
2 / 8
घरी मिरचीचे रोप लावणे अगदीच सोपे असते. त्याची भरपूर काळजी घ्यावी लागते असाही काही विषय नाही. कमी काळजीत तसेच कमी कष्टात हे रोप छान टवटवीत मिरच्या देते.
3 / 8
आधी छान पांढरे फुल बहरते मग मिरची लागते. मात्र कधी कधी मिरचीच्या रोपाला फुल येतच नाहीत. पण जर चांगले फुलच आले नाही तर मिरचीही मिळणार नाही.
4 / 8
उन्हाचे प्रमाण फारच असेल तर मिरचीचे रोप जास्त बहरत नाही. तसेच रोपाला पाणी द्यायचे विसरलात आणि रोपाला कमी पाणी मिळाले तरी रोपाला मिरच्या लागत नाहीत. अशावेळी हा उपाय करुन बघा.
5 / 8
फक्त हा एक उपाय केल्याने त्या न फुलणाऱ्या रोपाला मस्त हिरव्या गार मिरच्या भरभरून लागतील. पुन्हा बाजारातून मिरची आणायची गरजच पडणार नाही.
6 / 8
दही रोपांसाठी फार फायदेशीर असते. पंधरा दिवसातून एकदा मिरचीच्या रोपाला दह्याचे पाणी घाला. म्हणजेच पाण्याऐवजी ताक घाला. भांडभर ताक भरपूर झाले.
7 / 8
ताकामुळे रोप मस्त तरोताजे राहते. तसेच कोणत्याही प्रकारचे किडे किंवा रोग त्या रोपाला लागत नाहीत. रोपाला चांगले पोषण मिळते.
8 / 8
मोहरीचे तेल काढल्यानंतर मोहरीची पेंड उरते. ती खतासाठी वापरता येते. मोहरीच्या पेंडीमुळे मिरचीचे रोप सपाट्याने वाढेल तसेच पिकही चांगले देईल.
टॅग्स : बागकाम टिप्सअन्नमिरचीहोम रेमेडी