स्नेक प्लांट घरात असण्याचे ३ जबरदस्त फायदे, एखादं तरी स्नेक प्लांट आपल्याकडे असावंच, कारण......
Updated:February 3, 2024 13:14 IST2024-02-03T13:11:21+5:302024-02-03T13:14:27+5:30

स्नेक प्लांट हे असं एक रोपटं आहे जे आपण घरात आणि घराबाहेर अशा दोन्ही ठिकाणी ठेवू शकतो. म्हणजेच इनडोअर आणि आऊटडोअर अशा दोन्ही पद्धतीने ते लावता येतं. (gardening tips for snake plant)
स्नेक प्लांटमध्ये उंच वाढणारं आणि अखूड असणारं असे दोन प्रकार मिळतात. ज्यांच्याकडे भरपूर जागा आहे, त्यांनी उंच वाढणारं स्नेक प्लांट घ्यावं. इनडोअर म्हणून वापरायचं असेल किंवा जागा कमी असेल तर अखूड स्नेक प्लांटची निवड करता येते. (best indoor plant)
स्नेक प्लांटचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या रोपट्याची जास्त काळजी घ्यावी लागत नाही. या रोपट्याला सतत पाणी घालण्याचीही गरज नाही. त्यामुळे ज्यांना झाडांसाठी खूप वेळ नाही, त्यांच्यासाठी हे झाड उत्तम आहे. (Benefits of snake plant)
स्नेक प्लांट घरात लावल्याने काय फायदे होतात, याची माहिती portnoomarketgarden या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यातील सगळ्यात पहिला फायदा म्हणजे स्नेक प्लांट हवेतील विषारी वायू शोषून घेतो.
इतर कोणत्याही इनडोअर प्लांटपेक्षा स्नेक प्लांटद्वारे ऑक्सिजन उत्सर्जित होण्याचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे घरात स्नेक प्लांट असावंच.
स्नेक प्लांट हवेतील कार्बन डाय ऑक्साईड जास्तीतजास्त प्रमाणात शोषून घेते. त्यामुळे एअर प्युरिफाईंग प्लांट म्हणून स्नेक प्लांट ओळखले जाते.