1 / 5गुलाबाचं रोप आपण मोठ्या हौशीने लावतो, पण बऱ्याचदा त्याला चांगली फुलं येतच नाहीत. रोपाचीही वाढ नीट होत नाही. 2 / 5कारण त्यांना थोड्याशा अधिक पोषणाची गरज असते. गुलाबाला भरभरून फुलं येण्यासाठी त्याला कोणत्याही विकतच्या खताची गरज नाही. कारण आपल्या स्वयंपाक घरातच असे काही पदार्थ असतात जे गुलाबासाठी उत्तम खत ठरू शकतात. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया..3 / 5पहिला पदार्थ आहे केळीची सालं. केळीची सालं पाण्यात ८ ते १० तास भिजत घाला. त्यानंतर पाणी गाळून घ्या आणि गुलाबाला द्या. केळीच्या सालांमधून गुलाबाच्या रोपाला भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि फॉस्फरस मिळतं. ते रोपाच्या वाढीसाठी आणि गुलाबाला भरपूर फुलं येण्यासाठी उपयुक्त ठरतं. हा उपाय आठवड्यातून एकदा करा. 4 / 5दुसरा पदार्थ आहे कॉफी पावडर. कॉफी पावडर पाण्यात मिसळून कुंडीतल्या मातीमध्ये टाका. त्यातून मिळणारं नायट्रोजन गुलाबासाठी चांगलं असतं. हा उपाय १५ दिवसांतून एकदा करावा. 5 / 5तिसरा पदार्थ आहे इप्सम सॉल्ट. यातून मिळणाऱ्या मॅग्नेशियममुळे फुलांचा आकार वाढतो आणि ती अधिक टवटवीत फ्रेश दिसतात. महिन्यातून एकदा हा उपाय केला तरी चालेल.